भारतासाठी आनंदाची बातमी! कोरोनाबाबत आरोग्य मंत्रालयाने दिली 'ही' माहिती

corona
corona

नवी दिल्ली, ता. १८ - जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना भारतातून दिलासा देणारी बातमी आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुढच्या आठवड्यात चार लाखांवर पोहचण्याची शक्यता असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.  देशातील कोरोनाग्रस्तांच्या रोजच्या संख्येत विक्रमी भर पडली असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ५३ टक्के झाले आहे. 

देशात एका दिवसात कोरानाचे सर्वाधिक म्हणजे १२ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण गुरुवारी आढळले. सलग सातव्या दिवशी रोजची रुग्णसंख्या दहा हजारांवर वाढलेली आहे. गेल्या २४ तासांत आणखी ३३४ रुग्ण मृत्युमुखी पडले. सध्या एकूण रुग्णसंख्या साधारण तीन लाख ६७ हजारांवर, तर मृत्युसंख्या ही १२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण भारतात जगाच्या तुलनेत लक्षणीय म्हणजे ५२.९५ टक्के आहे. उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण (सक्रिय रुग्ण) सध्या एक लाख ६० हजार ३८४ असून, एक लाख ९४ हजार ३२४ लोक बरे झाले आहेत. हे प्रमाण सुमारे ५३ टक्के आहे. एक लाख लोकसंख्येमागे बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९४.०७ असून, मृत्यूदर ५.९३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

‘आयसीएमआर’नुसार 17 जूनपर्यंत 62 लाख 49 हजार 668 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर गेल्या 24 तासात 1 लाख 65 हजार 412 रुग्णांचे नमुने तपासण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 हजार 237 इतकी झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com