भाजपची तमिळनाडूत घोडचूक ते राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; ठळक बातम्या क्लिकवर

today news
today news

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी करण्यात आली. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली.  मंगळवारी राज्यात जवळपास २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. पण, आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासांत राज्यात 39,544  कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.  नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढील दोन महिन्यांसाठीचा लढ्याचा आराखडा आज जाहीर केला आहे. मे महिन्यात भर उन्हामध्ये पायी चालत संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी बोलून दाखविला. तमिळनाडू शाखेने प्रतिस्पर्धी द्रमुकचे संस्थापक एम. करुणानिधी यांनी लिहिलेल्या गीताचा तसेच त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून आणि कार्ती यांची पत्नी श्रीनिधी यांच्या नृत्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

Corona Update: मंगळवारी राज्यात जवळपास २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. पण, आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासांत राज्यात 39,544  कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाचा सविस्तर-

नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्ता येथील फुगे आणि कागदी डेकोरेशन तयार करणाऱ्या कारखान्याला सकाळी ११ च्या सुमारास आग लागली होती. वाचा सविस्तर-

राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षाच्या ट्विटमधील चहाचे मळे आसाममधील नव्हे तर परदेशांतील असल्याचे शोधकार्य करणाऱ्या भाजपची सोशल मिडियाच्याच बाबतीत दांडी उडण्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर-

Parambir Singh Letter: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसूली करण्यास सांगितल्याचा आरोप करत त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज दिवसभर सुनावणी झाली. वाचा सविस्तर-

Ishrat Jahan Case: इशरत जहाँ एनकाऊंटर प्रकरणात सीबीआय कोर्टाने तीन पोलिस अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. कोर्टाने तरुण बरोट आणि जीएल सिंघल यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांची सुटका केली.वाचा सविस्तर-

जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन असूनही तो कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. वाचा सविस्तर-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर येत्या 8 ते 10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वाचा सविस्तर-

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेत मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी करण्यात आली. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली. वाचा सविस्तर-

बायोएनटेक- फायझर BioNTech-Pfizer कंपनीने यासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीची कोरोनावरील लस १२ ते १५ वयोगटातील मुलांवर १०० टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर-

सुएझमध्ये सहा दिवसात जहाज काढण्यासाठी काय केलं? किती नुकसान झालं? तसंच या सर्व घटनेला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com