शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया ते ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Breakfast
Breakfast

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल, असा सर्व्हे व्हायरल झाला आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर 

१) शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृतीबाबत राजेश टोपेंनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पोटात दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वाचा सविस्तर

२) देशाचा जीडीपी वेगाने वाढतोय; सुब्रमण्यम स्वामींचा PM मोदींना घरचा आहेर 

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करतात. यावेळीही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. वाचा सविस्तर

३) "समझने वाले को..."; भाजप नेत्याचं सूचक ट्वीट

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. वाचा सविस्तर

४) दीपाली चव्हाण आत्महत्या: "शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या रेड्डींना सहआरोपी करा"

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील निलंबन कारवाई पुरेशी नसून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे. तसेच, त्यांची चौकशी केली जावी. वाचा सविस्तर

५) कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसमोर वर्षभरातच लस निष्प्रभ ठरेल; सर्वेमधून धक्कादायक माहिती 

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असला तरी आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. वाचा सविस्तर

६) ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव? प्रशांत किशोर यांच्या लीक सर्व्हेमुळे खळबळ

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये फटका बसू शकतो. त्यांना नंदीग्राममध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर

७) एक एप्रिलपासून ऑटोमेटिक पेमेंटमध्ये बदल; हा आहे नवा नियम

एक एप्रिल २०२१ पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक नियमांतही बदल होत आहे. वाचा सविस्तर

८) पत्नीचा गर्भपात, डिप्रेशनमुळे घेत होती गोळ्या; NCB कडून अटकेनंतर एजाजची प्रतिक्रिया

ड्रग पेडलर शादाब बटाटाने चौकशीदरम्यान एजाजचा उल्लेख केला. त्यावरून एनसीबीने एजाजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. वाचा सविस्तर

९) "किसिंग सीनला तुझा नकार का?"; ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर अभिषेकने दिलं मजेशीर उत्तर

मुलाखतीत ओप्राने ऐश्वर्याला 'नो किसिंग रुल'वरून प्रश्न विचारला. इतकं यशस्वी करिअर असताना, हॉलिवूडमध्येही ओळख प्रस्थापित केली असतानाही पडद्यावर 'नो किसिंग'चा नियम का, असा प्रश्न ओप्राने तिला विचारला होता. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com