
मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ) शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.
मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ) शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. तर दुसरीकडे देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलेब्रिटींकडून पाठिंबा दिला जात आहे. कर्नल टॉम मूर यांनी ब्रिटीश हॉस्पिटल्सच्या मदतीसाठी 4 कोटी डॉलर जमवले होते त्यांचे निधन झाले.
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेलसारखे शक्तीशाली राफेल फायटर जेट सामिल झाले आहे. या जेटशिवाय ११४ मीडियम फायटर जेट्स खरेदी करण्याबाबतही विचार सुरु आहे. वाचा सविस्तर
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावरील घुमुटावर झेंडा फडकवल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धू अजूनही फरार आहे. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. वाचा सविस्तर
कर्नल टॉम मूर यांनी ब्रिटीश हॉस्पिटल्सच्या मदतीसाठी 4 कोटी डॉलर जमवले होते. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल त्यांना 'कॅप्टन हिरो' म्हटलं गेलं होतं. तसेच देशातील सर्वांत मोठा सन्मान 'नाइटहूड' देखील त्यांना दिला गेला होता. वाचा सविस्तर
BMC Budget: शिक्षण समितीकडे अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे वाचा सविस्तर
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला. याची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधात आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. मिया खलिफाने यावर ट्विट केलं आहे. मात्र बॉलिवूड कलाकारांनी मौन बाळगल्याचंच दिसत आहे. वाचा सविस्तर
गोरेगाव इथं आदिपुरुष चित्रपटाचा सेट आगीत जळून खाक झाला. याआधीही असे अनेक सेट जळाले आहेत. त्यात प्रचंड नुकसानसुद्धा झालं आहे. वाचा सविस्तर
देशातील सर्वांत युवा महिला पायलट ठरलेल्या काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश वाचा सविस्तर
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाचा सविस्तर
केंद्रीय अर्थसंकल्पातून फारशी कृपा न झालेल्या क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी क्रीडा आचारसंहितेचा अंकुश बोथट केल्याची भेट दिली. राष्ट्रीय महासंघांना सूट देण्याचा अधिकार सरकारकडे वाचा सविस्तर
Edited By - Prashant Patil