'जगाच्या निरोपाची वेळ' वाझेंच्या स्टेटसने खळबळ ते देशात कोरोनाची परिस्थिती गेल्या वर्षीसारखीच; वाचा एका क्लिकवर

latest news top 10 bulletin
latest news top 10 bulletin

राज्यात एमपीएससी परीक्षेच्या तारखेवरून गोंधळ झाल्यानंतर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठारके सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांच्या भविष्याशी खेळ करू नका असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर खूनाचे आरोप केले आहेत. यानंतर बदली झालेल्या वाझेंनी टाकलेल्या व्हॉटसअॅप स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला असून या वादात आता संजय राऊत यांनी आपण कर्नाटकला जाण्याचा विचार करतो असं म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून गेल्या वर्षीसारखीच आकडेवारी समोर येत आहे. 

महाराष्ट्र - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार रोज विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या टीकेचे लक्ष्य ठरत आहे. शनिवारी) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तरुणांच्या भविष्याशी खेळ करू नका अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला. वाचा सविस्तर

देश - Corona Updates: देशात गेल्या वर्षीसारखी स्थिती; मागील 53 दिवसांत पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्यावर पोहोचली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी नव्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त होती. वाचा सविस्तर

पश्चिम बंगाल - माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला वाचा सविस्तर

मुंबई - सचिन वाझे यांच्या व्हाँट्सअँप स्टेटसमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या स्टेटसच्या शेवटच्या ओळीत वाझेंनी आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, आता सहन करण्याची क्षमता नसल्याचं लिहिलं आहे. वाचा सविस्तर

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या ATS ने हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. वाचा सविस्तर

महाराष्ट्र - मी स्वत: कर्नाटकला जाण्याचा विचार करतोय, तिथल्या लोकांचे मला फोन येत आहेत. डोकी फुटली तर मग रडत दिल्लीला जाऊ नका, असं म्हणत संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. वाचा सविस्तर

मनोरंजन - 'बधाई दो' असं राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातील लूकचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमधील त्याची शरीरयष्टी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. वाचा सविस्तर

मनोरंजन - अभिनेत्री कंगना राणावतसह इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या आगामी 'मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजंट ऑफ दिद्दा' या चित्रपटावरून नवीन वाद सुरू झाला आहे. वाचा सविस्तर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com