दिल्लीत बॉम्बस्फोट ते शिवसेना घेणार PM मोदींची भेट; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

 शिवसेना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीसाठी वेळ घेणार आहे. पुणे महापालिकेचे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक सादर..

दिल्लीत इस्त्राईली दुतावासाबाहेर क्रवारी सांयकाळी आयआयडी बॉम्बस्फोट झाला. शिवसेना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीसाठी वेळ घेणार आहे. पुणे महापालिकेचे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक सादर....वाचा महत्त्वाच्या बातम्या सविस्तर.

नवी दिल्ली : दिल्लीच्या लुटियंस भागात एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्त्राईली दुतावासाबाहेर शुक्रवारी सांयकाळी आयआयडी बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली.....वाचा सविस्तर

बंगळुरु : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा पॉर्नगेट प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसच्या आमदारावर विधान परिषदेत बसून आपल्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे...वाचा सविस्तर

मुंबई : चिघळलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी चर्चा करण्यासाठी शिवसेना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेणार आहे....वाचा सविस्तर

मुंबई : कोविड 19 उपचारांमध्ये यश मिळवण्यासाठी औषधांच्या अनेक नियमावली तयार केल्या गेल्या. शिवाय, काही औषधे एकत्रितपणे वापरण्याचा प्रयत्न केला गेला...वाचा सविस्तर

मुंबई : यापूर्वी खासगी वाहन आणि मालवाहतुक किंवा प्रवासी वाहतूक यासाठी वेगवेगlळा चालक परवाना अनिवार्य होता. मात्र, आता एका याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकाच चालक परवान्यावर मालवाहतूक आणि खासगी वाहतूक चालवता येणार असून, प्रवासी वाहतूक सुद्धा करता येणार आहे.....वाचा सविस्तर

नवी दिल्ली : जानेवारीला शेतकरी आणि पोलिसांमधील झालेल्या संघर्षानंतर संयुक्त किसान मोर्चाने 30 जानेवारीला संपूर्ण देशात सद्भावना दिवस म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे....वाचा सविस्तर 

पुणे : कोरोनामुळे घटलेले उत्पन्न, राज्य सरकारकडे थकलेले अनुदान या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी नवे स्रोत नसतानाही महापालिका आयुक्तांनी पुढील वर्षीचे सुमारे ७ हजार ६५० कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक शुक्रवारी सादर केले......वाचा सविस्तर

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्यादृष्टीने आजवर जाहीर झालेल्या स्वागत, मार्गदर्शक अन्‌ सल्लागार समितीच्यापुढे संमेलनाशी नाशिककरांना जोडून घेण्याच्या दिशेने पाऊल पडताना दिसत नाही....वाचा सविस्तर

मुंबई : सलमान आता एका मुव्हीसाठी किती कोटी पैसे घेतो याचा आकडा त्याच्या चाहत्यांना सांगण्याची गरज नाही. तो आता थेट टक्केवारीत बोलतो. त्याचा कोणताही चित्रपट 100 कोटींच्या पुढे सहज जातो म्हणून भागीदारीत पैसे घेतो...वाचा सविस्तर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news top ten news marathi news Delhi maharashtra Pune PM Modi Israel Bomb spot Shivsena