esakal | उत्तराखंडमध्ये आपत्ती ते प्रकाश आंबेडकरांची मोदींवर जहरी टिका;बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तराखंडमध्ये आपत्ती ते प्रकाश आंबेडकरांची मोदींवर जहरी टिका;बातम्या एका क्लिकवर

भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मियाँ खलिफानं पुन्हा ट्विट करून, भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. ऐतिहासिक चवदार तळ्याचं शुद्धीकरण होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

उत्तराखंडमध्ये आपत्ती ते प्रकाश आंबेडकरांची मोदींवर जहरी टिका;बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला आहे. त्याचवेळी जगभरात हिमनद्या वितळण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं असून, शास्त्रज्ञांनी भारतालाही इशारा दिलाय. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मियाँ खलिफानं पुन्हा ट्विट करून, भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. ऐतिहासिक चवदार तळ्याचं शुद्धीकरण होण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर आता देशात टेस्ट शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची सुविधा होणार आहे.

उत्तराखंड : उत्तराखंडच्या घटनेमुळे 8 वर्षापूर्वीच्या केदारनाथ प्रलयाची आठवण झाली. सविस्तर वाचा

नवी दिल्ली  : उत्तराखंडमध्ये हिमनग कोसळून हाहाकार उडाल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढविणारे संशोधन पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. वाढत्या तापमानामुळे २१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट झाला आहे. सविस्तर वाचा

पुणे : मी दिल्लीत का जात नाही म्हणून मला विचारलं गेलं, पण माझा लढा हा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. सविस्तर वाचा

महाड : येथील चवदार तळ्याला डॉ. आंबेडकर यांचे लाखो अनुयायी दरवर्षी भेट देतात. त्यापैकी अनेक जण तळ्याचे पाणी घेऊन जातात. परंतु येथील पाण्यात शेवाळ असल्याने ते शुद्ध करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. सविस्तर वाचा

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मियाँ खलिफा यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर आवाज उठवल्यानंतर देशात सोशल मीडियावर विरोधाचं वादळ उठलं होतं. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसेन्स बनवणे कटकटीचे काम मानले जाते. लायसेन्ससाठी आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, दलालांना हाती घ्यावं लागतं. सविस्तर वाचा

पुणे : शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) कुटुंबीयांनी पाळलेला परदेशी श्‍वान बंगल्याबाहेर पडला. किंमती श्‍वान रस्त्याने एकटाच पळताना पाहून चोरट्यांनी त्याला पळविला. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या बायोमेडिकचे विद्यार्थी आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सर्जिकल ग्लुचा एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांच्या या शोधामुळे अवघ्या काही सेंकदात जखम भरण्यास मदत होणार आहे. सविस्तर वाचा

बीजिंग : सौंदर्यवर्धनासाठी केलेली शस्त्रक्रिया (कॉस्मेटिक सर्जरी) चुकल्यामुळे चीनच्या एका अभिनेत्रीचे नाक विद्रूप झाले. त्यामुळे तिला भूमिका गमवाव्या लागल्या असून, याचा मोठा आर्थिक फटकाही बसणार आहे. सविस्तर वाचा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सिराज आणि कुलदीपला बाकावर बसवण्यात आले.  सविस्तर वाचा