esakal | दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन ते देशात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन ते देशात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी दोन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात भारतात तब्बल २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याचदरम्यान इतर देशांनीही भारतातून येणाऱ्या प्रवासी आणि विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे. हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना मंगळवारपासून (दि.20) 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यापासून देशात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजवण्यास सुरवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक ठरताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी दोन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात भारतात तब्बल २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 1 लाख 44 हजार 178 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी 1 हजार 619 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात झालेली सर्वाधिक मृत्यू नोंद ठरली आहे. वाचा सविस्तर

कोलकाता - देशात कोरोनाचा संसर्ग दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. यातच देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका, कुंभमेळा या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

पुणे - प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार कायम ठेवल्याबद्दल भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय-एम) रविवारी टीकेची झोड उठविली. देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर एका पक्षपाती पक्षाचे प्रचारक म्हणून ते आपले रुप दाखवत आहेत, असा आरोप सीपीआय-एमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा अवलंब केला आहे. याचदरम्यान इतर देशांनीही भारतातून येणाऱ्या प्रवासी आणि विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे. हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना मंगळवारपासून (दि.20) 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. या काळात भारतातील एकाही विमानाला हाँगकाँगमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. वाचा सविस्तर

IPL 2021 11th Match: शिखर धवनची 92 धावांची जबऱ्या खेळी आणि त्याला इतर फलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाबला 6 विकेट राखून पराभूत केले. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या विजयासह 4 गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने दिल्लीच्या डावाला सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. पृथ्वी 32 धावांची उपयुक्त खेळी करुन परतल्यानंतर स्मिथ मैदानात आला. पण तो फार काळ मैदानात टिकला नाही. तो 9 धावा करुन माघारी फिरला. वाचा सविस्तर

सोलापूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने राज्याच्या सध्याच्या राजकारणात मोठा परिणाम होण्याची शक्यता नसली तरीही या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी ही जागा निवडून द्या, राज्यातील पुढील करेक्ट कार्यक्रम मी करतो, असे ठामपणे जाहीर सभेत सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीने ही निवडणूक ताकदीने लढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार ? याची उत्सुकता राज्याला लागली आहे. वाचा सविस्तर

नागपूर - रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेवर कधी नव्हे एवढा भार पडला आहे. रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य विमा योजना, महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स यांनी पुढाकार घेतला असून लवकरच शहरात जवळपास 2400 नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत. यामुळे रुग्णांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर

नाशिक - एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण आहे. दुसरीकडे अशा धक्कादायक घटना घडत आहे. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली. दोन वॉर्डबॉयसह तिघांनी दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरल्याची घटना नाशिकच्या एका रुग्णालयात घडली. वाचा सविस्तर

मुंबई- ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून शनिवारी १६८ रुग्णांना उपनगरीय रुग्णालयातून कोविड रुग्णालय आणि जम्बो केंद्रात हलविल्यानंतर आज मुंबईची ऑक्सीजनची चिंता मिटली आहे. मुंबई महानगर पालिका आता रोज २८५ मेट्रीक टन ऑक्सीजनचा साठा करणार आहे. वाचा सविस्तर