शशी थरुर यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा ते राकेश टिकेत यांच्या डोळ्यात अश्रू, ठळक बातम्या एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Friday, 29 January 2021

उत्तर प्रदेश पोलिसांनी पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज 29 फेब्रुवारी रोजी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.

26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे. दरम्यान राकेश टिकेत यांनी कृषी कायदे मागे घेण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे. तसेच कृषी कायदे रद्द केले नाही तर फाशी घेऊ, आत्महत्या करु असं ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्यासह सात पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज 29 फेब्रुवारी रोजी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्यासह सात पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : आज 29 जानेवरी रोजी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर वाचा

कालपेट्टा (केरळ) : देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे सत्य आणि तपशील ठावूक नसून ते जर समजले तर संपूर्ण देशात आंदोलनाचे रान पेटेल, असा इशारा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिला. सविस्तर वाचा

जळगाव  : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात दोन महिलांच्या अंडाशयाच्या गाठीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले आहे.  सविस्तर वाचा

पुणे : ॲपवरून ‘डेटिंग’धोक्याचं; तरुण सहज फसतायत जाळ्यात! सविस्तर वाचा...

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जसजशा जवळ येतायत तसतशी राजकीय पक्षांची एकमेकांवरील चिखलफेक अधिकाधिक तीव्र होत जाणार हे सांगायला कुणाही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. सविस्तर वाचा

सिडको (नाशिक) : काही दिवसांपासून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अपूर्व हिरे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या होत्या. सविस्तर वाचा

वैराग (सोलापूर) : ''माझ्या पतीला मारू नका'', ''तुम्हाला काय हवं ते घेऊन जावा पण त्यांना मारू नका'' असा आरडाओरड करीत एका 65 वर्षीय पत्नीने रात्री घरात पडलेल्या चोरांच्या दरोडा प्रसंगातून स्वतःला सावरत पतीचे प्राण वाचवले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने उद्या (ता. २९) संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. मात्र वादग्रस्त कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेससह १८ पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले आहे. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning news updates shashi tharoor rajdeep sardesai rakesh tikait farmer protest sandeep deshpande apurva hire