esakal | रशियात 2036 पर्यंत पुन्हा पुतीन ते बंगालमध्ये TMC उमेदवाराच्या घरात इव्हीएम, वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

morming.jpg

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

रशियात 2036 पर्यंत पुन्हा पुतीन ते बंगालमध्ये TMC उमेदवाराच्या घरात इव्हीएम, वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह देशातील पाच राज्यांत आज विधानसभा निवडणूक होत आहे. यासाठी सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पुढील 15 वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी त्यांनी घटनेत तसे बदल केले आहेत. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.


नवी दिल्ली - तामिळनाडूच्या (Tamilnadu Assembly Election 2021) 234, केरळच्या (Kerala Assembly Election 2021) 140 आणि पुद्दुचेरीच्या (Puducherry Assembly Election 2021) 30 विधानसभा जागांवर आज (दि.6) मतदान होत आहे. तिन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होईल. आसामच्या (Assam Assembly Election 2021) 126 पैकी उर्वरित 40 जागांवर तिसऱ्या टप्प्याचे मतदान होईल. पश्चिम बंगालच्या (West Bengal Assembly Election 2021) 31 जागांवरही मतदान होईल. वाचा सविस्तरमॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा पुढील १५ वर्षे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी (ता.५) त्यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये त्यांना सन २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 


राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्य पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे आणि गर्दीची ठिकाणी बंद राहणार आहेत. परंतु, या सगळ्या परिस्थितीमध्ये उपनगरीय लोकल सेवांचं काय असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला होता. वाचा सविस्तर


नवी दिल्लीः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आज, मंगळवारी ४१ वा स्थापना दिवस आहे! भाजप कार्यकर्ते स्थापना दिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात संबोधित करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा सविस्तर


नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील विदर्भाचे वजन घटले आहे. कॅबिनेटमध्ये आता सातपैकी पाचच मंत्री विदर्भातील शिल्लक राहिले आहे. वैधानिक विकास मंडळाच्या स्थापनेस टाळाटाळ केली जात असून वैदर्भीयांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर


पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशामुळे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर सोमवारी (ता. 5) रात्री आठपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर समितीच्या 28 परिवार देवता असून, तिथे देखील भाविकांना 30 एप्रिलपर्यंत बंदी राहणार आहे. वाचा सविस्तर


मुंबईकरांच्या त्रासात भर, नायरचे डॉक्टर सार्वजनिक सुट्टीवर जाण्याच्या तयारीत
मुंबईत कोरोनाचे संकट वाढत असताना नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी आज दुपारी चार वाजल्यापासून सार्वजनिक सुट्टीवर जाण्याचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्या मान्य न केल्यास सार्वजनिक सुट्टीवर जाऊ असे या डॉक्टरांनी म्हटले आहे. वाचा सविस्तरनाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काही भागात अंशत:, तर काही भागात पूर्ण लॉकडाउन सुरू आहे. याव्यतिरिक्त काही शहरांमध्ये शनिवारी व रविवारी असे दोन दिवस लॉकडाऊन सुरू आहे. वाचा सविस्तर


पुणे : सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, त्या सोसायटीकडून नियमांचे पालन न झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.  वाचा सविस्तर

मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची तपासणी; सांगली महापालिकेच्या सीसीसी केंद्रात 38 रुग्ण
सांगली : महापालिका क्षेत्रात बाहेरून विशेषत: मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूचना दिल्या आहेत. बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. वाचा सविस्तर