UAE
UAEesakal

UAEच्या जागतिक चित्रकला स्पर्धेत नाशिकच्या चित्रकाराने मारली बाजी

Published on

डीजीपी नगर (नाशिक) : UAE च्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या जागतिक चित्रकला स्पर्धेत नाशिकचे चित्रकार मोहन रमेश जाधव यांनी काढलेल्या चित्राला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 1000 US डॉलर व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दुबई (Dubai) येथील आर्ट अँड क्राफ्ट्स संस्थेच्या मार्फत UAE@50 ही जागतिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती, यात 15 देशातील एकूण 104 कलावंतानी सहभाग घेतला होता. सर्व चित्रकारांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून UAE चा 50 वर्षाचा प्रवास व त्याची झालेली प्रगती चित्र स्वरूप मांडली होती.

UAE@50 या जागतिक चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या नाशिककर मोहन रमेश जाधव यांनी साकारलेले चित्र
UAE@50 या जागतिक चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या नाशिककर मोहन रमेश जाधव यांनी साकारलेले चित्रesakal
UAE
कर्ज देणारे 'हे' App इन्स्टॉल किंवा लिंक ओपन कराल तर बसेल फटका

या स्पर्धेत मोहन रमेश जाधव यांच्या चित्राला प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहन रमेश जाधव यांनी आपले कलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय तिळभांडेश्वर नाशिक येथुन केले असून पदव्युत्तर शिक्षण त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथुन केले आहे.

UAE
हप्त्यावर टीव्ही घेणारा मी पहिलाच मंत्री असेन - नितीन गडकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com