

Manjeet Kaur Punjab Influencer social media
esakal
Manjeet Kaur Death : पंजाबी इन्फ्लुएन्सर मंजीत कौर यांच्या मृत्यू प्रकरणी चंदीगड पोलिसांनी अपहरण आणि हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक मंजीत कौर यांच्या आई कांता देवी यांच्या तक्रारीवरून सेक्टर-३४ पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मंजीत कौर यांना दोन परिचितांनी सेक्टर-३४ येथील दारूच्या दुकानाजवळ बोलावले आणि तेथून त्यांचे अपहरण करून मोरिंडा येथील जंगल परिसरात नेले. आरोपानुसार, दोघांनी मंजीत यांना झाडाला बांधून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. ही घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडल्याचे सांगितले जात आहे.