
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत टेस्लालाही फायदा : गडकरी
नवी दिल्ली : जर यूएस-आधारित ईव्ही निर्माता टेस्लाने (Tesla) भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles ) तयार करत असेल तर कंपनीलाही त्याचा फायदा होईल, असे मत केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते दिवस दूर नाही जेव्हा देशातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या किमतीपेक्षा कमी असतील असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षी, अवजड उद्योग मंत्रालयानेदेखील टेस्लाला कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी भारतात आपल्या प्रतिष्ठित इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले होते. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. (Nitin Gadkari On Tesla Car)
हेही वाचा: कोरोना काळातील 15 टक्के फी कपातीची तातडीने अंमलबजावणी करा
गडकरी म्हणाले की, "जर इलॉन मस्क भारतात ईव्ही वाहनांचं उत्पादन करण्यास तयार असतील तर कोणतीही अडचण नाही. भारतात या, उत्पादन सुरू करा, भारत एक मोठी बाजारपेठ आहे, ते भारतातून निर्यात करू शकतात," असे त्यांनी एका संवाद सत्रात सांगितले होते. तर त्यापूर्वी म्हणजे 26 एप्रिल रोजी गडकरींनी जर टेस्ला भारतात ईलेक्ट्रिकल वाहनं तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नसल्याचे म्हटले होते, परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये, असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतर आज त्यांनी जर कंपनीने भारतात ईव्ही तयार केल्यास फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे. (EV Vehicles In India )
हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; CET परीक्षेच्या तारखा जाहीर
टेस्लाचे भारतात स्वागत; पण, "मेक इन चायना चालणार नाही : गडकरी
टेस्लाने (Tesla) भारतात कारखाने सुरू करणे, विक्रीसाठी कार तयार करणे आणि निर्यात करणे हे स्वागतार्ह आहे, परंतु टेस्लाने चीनमधून (China) कार आयात करू नये, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. "मेक इन चायना आणि भारतात विक्री'' हा चांगला प्रस्ताव नाही." असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते. (Nitin Gadakari On Tesla Car)
टेस्ला कंपनी त्यांची वाहने (CAR) भारतात आयात करून विकण्यास उत्सुक आहे. यासाठी टेस्लाने आयात शुल्कात कपात करण्यासाठी जवळपास वर्षभर दिल्लीतील अधिकाऱ्यांशी लॉबिंग केले होते. तर, दुसरीकडे भारतातील दर जगातील सर्वाधिक असल्याचे विधान मस्क यांनी यापूर्वीच केले आहे. तसेच टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया" च्या अनुषंगाने भारतात उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी भारतातील त्यांच्या गुंतवणूक योजनेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
हेही वाचा: मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं हे कारण
मस्क यांना भारत सरकारने टेस्लाच्या कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र, मस्क यांच्या या मागणीला भारत सरकार तयार नसून, मस्क यांच्या दबावाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आधी मेक इन इंडिया मग डिस्काउंटबद्दल बोला
टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवरील (Electric Car) आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेक मंचांवर म्हटले आहे. तथापि, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला कडक शब्दात सांगितले आहे की, टेस्ला भारतात येईल आणि आधी कार बनवेल, त्यानंतर सवलतींचा विचार केला जाईल.
Web Title: Tesla Will Benefit If It Makes Electric Vehicles In India Says Nitin Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..