सेल्फीचा नाद भोवला.. तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सेल्फीच्या नादात आपला जीव गमवला
Three Kerala students drown off
Three Kerala students drown offसकाळ डिजिटल टीम

सध्या सेल्फी म्हणजे सवयीचा भाग झालाय. कुठेही गेले तरी माणसाला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. कित्येकदा ही सेल्फी अनेकांच्या जीवावर बेतली आहे तरी सेल्फीचा नाद कुणाचाच सुटत नाही.अशातच केरळमधील तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सेल्फीच्या नादात आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी उडुपी येथील सेंट मेरी बेटावर सेल्फी घेताना तिघांचा बुडून मृत्यू झाला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. (Three engineering students from Kerala drowned at St Mary's Island in Udupi.)

Three Kerala students drown off
माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...

उडुपी येथील एसटी मेरी बेटाच्या (St Mary's Island) खडकावर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना एकजण घसरला आणि समुद्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांनी उडी मारली. मात्र हे तिघे पण बुडाले. यातील वाचवण्यासाठी उतरलेले मित्र बुडताच जीवरक्षकांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाा पण रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अॅलेन रेजी,अमल सी अनिल, आणि अँटोनी शिनोई अशी मृतांची नावे आहेत.

Three Kerala students drown off
नवविवाहित जोडप्याला 'जळजळीत' भेट.. लग्नात एकच हवा!

कोट्टायमच्या मंगलम कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे दोन प्रोफेसरसह 42 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप सेंट मेरी बेटावर आला. त्यांना प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रतिबंधित भागात प्रवेश केला, त्याठिकाणी पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध घालण्यात आले होते.

यासंदर्भात इशारा फलकसुद्धा तिथे लावण्यात आला होता. मात्र काही विद्यार्थ्यांना खडकावर सेल्फी घ्यायचा होता आणि त्यांनी या संदर्भात त्यांनी जीवरक्षकाची विनंती केली. फक्त एक सेल्फी घेण्याची परवानगी घ्या आणि टोकाला जाऊ नका असे सांगितल्यानंतरही, मुले खडकावर चढले आणि सेल्फी काढण्याच्या घाईत खडकाच्या टोकावर पोहोचले आणि त्यांच्यापैकी एक घसरला आणि खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी दोन मुलांनी उड्या मारल्या.

जीवरक्षकांनी तत्परतेने त्या दोघांनाही वाचवले. त्यांना किनाऱ्यावर आणले.आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान खडकाच्या टोकावरुन पडलेल्या पहिल्या विद्यार्थ्याचा मृतदेहही सापडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com