esakal | पुण्यात कडक निर्बंध ते सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळे भारतात चिंता; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Duparachta Batamya

विविध क्षेत्रातील बातम्या खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी फक्त एका क्लिकवर!

पुण्यात कडक निर्बंध ते सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजामुळे भारतात चिंता; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण करण्यास सुरवात केली आहे. पुण्यातही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. मनसुख हिरेनप्रकरणी भाजपने जे.जे.रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच सुएझ कालव्यात भव्य जहाज अडकल्याने भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका उडणार का या चर्चांना उधान आलं आहे. अशा विविध क्षेत्रातील बातम्या खास 'सकाळ'च्या वाचकांसाठी फक्त एका क्लिकवर!

१) पुण्यात आता कडक निर्बंध; वाचा नवीन नियमावली 

कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून नाईलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जे नियम आहेत ते पाळा असं आवाहन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. सविस्तर वाचा

२) रश्मी शुक्लांनी नेमकं काय केलं? वाचा अहवालातील ताशेरे

सार्वजनिक सुव्यवस्थेस काही व्यक्ती धोका पोचवू शकतात असे सांगून रश्मी शुक्ला यांनी इंडियन टेलिग्राफ कायद्याच्या कलम ५(२) अन्वये काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप करण्याची परवानगी घेतली होती. सविस्तर वाचा

३) मनसुख यांच्या डायटॉम टेस्टवरुन भाजपाचा जे.जे. रुग्णालयावर गंभीर आरोप 

जे.जे. हॉस्पिटलमध्ये डायटॉम टेस्ट होऊ शकत नाही, मग तरीही तिथे ही चाचणी का केली? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. सविस्तर वाचा

४) 'मां अगले जन्म में फिर अमिताभ पैदा करना।' माेदी सरकारने जबरदस्ती निवृत्त केलेल्या IPS अधिका-याच्या IAS भावाची भावना 

केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर योगी सरकारने अमिताभ ठाकूरसह अन्य दोन्ही अधिकाऱ्यांना निवृत्त केले आहे. सविस्तर वाचा

५) भारतात पेट्रोल डिझेलचा भडका उडणार? सुएझ कालव्यात अडकलंय जहाज 

जवळपास तीन फुटबॉलच्या मैदानाइतकं हे जहाज मोठं आहे. 400 मीटर लांबी आणि 59 मीटर उंची असलेलं हे जहाज खराब हवामानामुळे कालव्यात अडकलं. सविस्तर वाचा

६) प्रिन्स हॅरीला मिळाली नोकरी; 'वर्क फ्रॉम पॅलेस'ची मुभा! 

नोकरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रिन्स हॅरीला अमेरिकेतील एका कोचिंग आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी मिळाली आहे. सविस्तर वाचा

७) अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्ज तटरक्षक दलाकडून जप्त

भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीप मिनिकॉय बेटांजवळ मोठी कारवाई करत 300 किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 3 हजार कोटी रुपये आहे. सविस्तर वाचा

८) Bhandup Hospital fire: उद्धव ठाकरेंनी दिलं ठरलेलं उत्तर 

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला काल रात्री भीषण  आग लागली. रात्री १२ च्या सुमारास ही आग लागली होती. सविस्तर वाचा

९) नेहा कक्करची होळी पार्टी सुरू; पतीसोबत पूल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

नेहाचा हा होळी पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फक्त चार तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सविस्तर वाचा

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image