esakal | बाप्पाच्या आगमनामुळे कोरोनाकाळात नवचैतन्य! निपाणीसह परिसरात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या आगमनामुळे कोरोनाकाळात नवचैतन्य! निपाणीसह परिसरात स्वागत

या उत्सवामुळे कोरोना संकट काळातही नवचैतन्य अनुभवायला मिळाले.

बाप्पाच्या आगमनामुळे कोरोनाकाळात नवचैतन्य! निपाणीसह परिसरात स्वागत

sakal_logo
By
राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव): गौरी-गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा आणि कुंभार वाड्यामध्ये गुरुवारी (ता.09) रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये होते. बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. तर शुक्रवारी(ता.10) विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाल्यावर गणपतीची आरस, पूजेचे सामान याबरोबरच सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. या उत्सवामुळे कोरोना संकट काळातही नवचैतन्य अनुभवायला मिळाले.

हेही वाचा: निपाणी : दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी

गणरायाच्या आगमनापूर्वीच्या तयारीला दोन दिवसापासून वेग आला होता. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी मोठ्या संख्येने असलेले नोकरदार आणि व्यवसायिक आपापल्या शहर आणि गावाकडे येऊन गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती. गणेश भक्तांच्या या उत्साहामुळे बाजारपेठांनादेखील नवचैतन्य आले आहे. गणेश चतुर्थीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी जनसागरच बाजारपेठांमध्ये उसळल्याचे चित्र होते. या वेळी श्रीफळ, कवंडाळ, काकडी, शेवाड तसेच विविधांगी फळे, फुले खरेदीसाठी महिलावर्गाची विशेष लगबग दिसून आली. त्याचबरोबर गणेशमूर्ती जेवढी आकर्षक त्याहीपेक्षा सजावट चांगली हवी म्हणून आरास व माटी सामान खरेदी केले जात होते.

हेही वाचा: निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना

विशेष म्हणजे या उत्सवावर महागाईचे सावट असले तरी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व जण आपल्या ऐपतीप्रमाणे सण साजरा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. येथील बेळगाव नाका, चाटे मार्केट, अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, दलाल पेठ, गांधी चौक, गुरुवार पेठ, सटवाई रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गणरायाच्या मूर्ती उपलब्ध झाल्या होत्या. सकाळपासूनच भाविक मूर्ती पारंपारिक वाद्यांच्या गजरात दुचाकी आणि चारचाकी वाहनातून नेत होते.

हेही वाचा: निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

उत्साहाच्या भरात नियमांना तिलांजली

गणेश मूर्तीसह सजावट साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नव्हते. पोलिस सतत नागरिकांना बाजारपेठेत आवाहन करीत होते. मात्र पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत भाविकांकडून कोरोना नियमांना तिलांजली दिली जात होती.

हेही वाचा: निपाणी-गडहिंग्लज मार्गावर सुमारे 4 लाखाचा दारुसाठा जप्त; अबकारी पथकाची कारवाई

विद्युत रोषणाईचे नवे ट्रेंड

यंदा विद्युत रोषणाईच्या भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी ५० ते १००, वॅटच्या सिंगल मल्टिकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोबलाइट्स, लेझर लाइट्स, पारलाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र, एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारांमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा: निपाणी : विवाहितेचा नदीत पडून मृत्यू, भाट नांगनूरातील घटना

'गणेशोत्सवात येणाऱ्या भक्तांना कोणतीही सक्ती नसली तरी स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय करणे सर्वासाठीच महत्त्वाचे आहे. साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा. त्याचप्रमाणे उत्सव काळात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून गणेश मंडळांसाठी सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.'

- जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

loading image
go to top