esakal | हाथरस पीडितेच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या 
sakal

बोलून बातमी शोधा

esakal

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

हाथरस पीडितेच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हाथरस प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागा वाटपाची माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bihar Election: महाआघाडीचं ठरलं, राजद 144 तर काँग्रेस 70 जागांवर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. शनिवारी (दि.3) राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागा वाटपाची माहिती दिली आहे. या निवडणुकीत राजद 144 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस 70 जागा आणि त्याचबरोबर वाल्मिकीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार आहे. सीपीएमला 4 जागा, सीपीआयला 6, सीपीआयला (माले) 19 जागा देण्यात आल्या आहेत. सविस्तर बातमी-

गलवान शहीदांच्या स्मरणार्थ स्मारक; चिनी सैन्याला शिकवला होता धडा

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात हुतात्मा झालेल्या वीस भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने स्मारक उभारले आहे. पूर्व लडाखमधील पोस्ट क्र ः १२० या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले असून मागील आठवड्यामध्येच त्याचे उद्‌घाटन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर बातमी-

भारताच्या 'शौर्य'ची यशस्वी झेप; 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता

भारताने शनिवारी ओडिशातील बालासोर येथे शौर्य या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अण्वस्त्र सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणेला मजबूत करणारे आहे. एलएसीवर चीनबरोबर तणाव सुरु असतानाच भारताने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. सविस्तर बातमी-

hathras case live update: राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली पीडितेच्या आई-वडिलांची भेट

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका 19 वर्षीय दलित मुलीवर झालेला कथीत बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले होते. मात्र त्यांना भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा भेटीसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी रवाना झाले आहेत. सविस्तर बातमी-

डोनाल्ड ट्रम्प यांचा आजार वाढला तर कोणाकडे जाणार सत्ता?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती गंभीर बनली तर अशा परिस्थितीत देशाची सत्ता उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्या हातात दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. सविस्तर बातमी-

आर्मेनियाशी युद्धामुळे अझरबैजानचं मोठं नुकसान; 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू 

रशियासारखंच अर्ध्या आशिया आणि अर्ध्या युरोप मध्ये येणाऱ्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये अझरबैजानचे खूप नुकसान झाले आहे. या युद्धात 3 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आली आहे. सविस्तर बातमी-

पुतीन विरोधी पत्रकाराची पेटवून घेत आत्महत्या; फेसबुकवर केली 'सुसाइड पोस्ट

शियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा विरोध वाढताना दिसत आहे. रशियातील न्यूज एडिटर इरीना स्लावीना यांनी मंत्रालयाच्या ऑफीससमोरच स्वत:ला आग लावून घेतली आणि यात त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी इरीना यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी रशियन सरकारला जबाबदार धरा, असं त्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.  सविस्तर बातमी-