esakal | हाथरस प्रकरणी दोषींचा समुळ नाश निश्चित; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

yogi aadityanath

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

हाथरस प्रकरणी दोषींचा समुळ नाश निश्चित; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हाथरस प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. दोषींचा समूळ नाश करण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात  हरसिमरत कौर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.  ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.


कृषी कायद्याविरोधात आंदोलन,माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना अटक

नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाकडे मोर्चा घेऊन जात असलेले शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल, त्यांच्या पत्नी तथा माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना गुरुवारी (दि.1) रात्री ताब्यात घेतले. सविस्तर बातमी-

भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ; हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी त्यांनी बलात्काऱ्यांना चेतावणी देत आई-बहिणींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांचा संपूर्ण नाश करण्यात येईल असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

खुशखबर! सणांच्या पार्श्वभूमीवर 200 स्पेशल ट्रेन धावणार

भारतीय रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 200 विशेष रेल्वे (Special Trains) सुरु करण्याची योजना आखत आहे. यामुळे सणांच्या काळात प्रवास करणाऱ्यांची सोय होणार आहे. याबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाचे  अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली आहे. सविस्तर बातमी-

'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता पॉझिटिव्ह

पश्चिम बंगालचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार अनुपम हाजरा यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मला कोरोनाची लागण झाली तर मी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) हाजरा यांच्यावर निशाणा साधला होता. आता हाजरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सविस्तर बातमी-

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना; मेलानिया यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.  ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. सविस्तर बातमी-

अद्दल घडली का? ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चीनने उडवली खिल्ली

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वात शक्तीशाली देशाच्या प्रमुखाला कोविड-19 ची लागण झाली असल्याने जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी कामना केली आहे. असे असले तरी चीनने यावरुनही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. सविस्तर बातमी-

भारतीयांना दिलासा देत ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला असून प्रसिंडेशियल डिबेट्सनाही सुरवात झालीय. मात्र, आता या दरम्यानच अमेरिकेतील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. अमेरिकेतील एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिसावर आणलेल्या बंदीच्या निर्णयाला थांबवलं आहे. सविस्तर बातमी-