
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना एम्स, ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विदेशात, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे.
भाजपने केले काँग्रेसला 'फॉलो'; 'लूझर्स लक', अपयशी नेत्यांना पुन्हा संधी
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नवी टीम आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीममध्ये अनेक साम्य आहेत. निष्ठावंत आणि लांगूलचालन करणारे अशातले हे साम्य नसून 'लूझर्स लक'बाबतचे हे साम्य आहे. दोन्ही पक्षांनी अनेक अपयशी नेत्यांना प्रोत्साहन आणि संगोपन करण्याचे काम सुरु केले आहे. मागील महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक फेरबदल करुन अनेक अपयशी नेत्यांना संधी दिली आहे. सविस्तर बातमी-
covid-19: उमा भारती एम्समध्ये दाखल; बाबरी प्रकरणी कोर्टात उपस्थित राहण्याची इच्छा
भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर त्यांना आज एम्स, ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भारती यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. हॉस्पिटमध्ये दाखल होण्याची त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत सविस्तर बातमी-
भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचं बेंगळुरूविषयी धक्कादायक वक्तव्य; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रमुख आणि खासदार तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) यांनी बेंगळुरुसंबंधी मोठं वक्तव्य केलंय. बेंगळुरु दहशतवादी उपक्रमांचे (Terror Activites) केंद्र बनले आहे, असा दावा सुर्या यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. राष्ट्रीय चौकशी विभागाचे एक कायमस्वरुपी कार्यालय कर्नाटकच्या राजधानीमध्ये असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सविस्तर बातमी-
Corona Updates: देशात आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांनी 60 लाखांचा आकडा पार केला आहे. दररोज देशात 90 हजारांच्या जवळपास कोरोनाच्या नवीन रुग्णांचं निदान होत आहे. अशातच एक मोठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, देशात आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या (recovery rate of covid 19) 50 लाखांच्या वर गेली आहे. विशेष म्हणजे मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare) दिली आहे. सविस्तर बातमी-
निवडणुकीआधी आयकर बुडवणाऱ्या ट्रम्प यांचा केसांवरचा खर्च थक्क करणारा!
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी 15 वर्षांपैकी 10 वर्ष आपला आयकर भरला नाही. 2016 साली म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांनी 750 डॉलरचा आयकर भरला, त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर 2017 साली 750 डॉलरचा आयकर भरला. द न्यूयॉर्क टाईम्सने सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. सविस्तर बातमी-
Coronavirus: मधुमेहावरील 'स्टँटिन्स'मध्ये ऍंटी-कोरोना व्हायरस गुणधर्म; संशोधनात समोर आले निष्कर्ष
जगभरात कोरोनाची साथ दिवसेंदिवस पसरत आहे. कोरोनावरील लशींवर सध्या जगभरात संशोधन सुरु आहे. यादरम्यानच आता चांगली बातमी आली आहे. कोरोनाच्या रुग्णांची त्रास कमी करण्यासाठी स्टँटिन्स महत्वाचं ठरत आहे, असं निरीक्षण एका संशोधनात दिसून आलं आहे. या औषधाचा उपयोग शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्यासाठी केला जातो. अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजी (AJC) आणि द ईएमबीओ जर्नलमध्ये छापून आलेल्या रिसर्चनुसार, स्टँटिन्समुळं कोरोना रुग्णांना झालेली लागण 50 टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते. विषेश म्हणजे स्टँटिन्स हे औषध स्वस्त असून ते 5 ते 50 रुपयांत मिळून जातं. सविस्तर बातमी-
कोरोनाच्या लशीमुळं 5 लाख शार्कची कत्तल होण्याचा धोका!
कोरोना लस तयार करताना निसर्गाचा समतोल ढासळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी शार्क माशाच्या यकृतातील तेल आणि शार्कच्या रक्तातील अंश वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जगातील 5 लाख शार्क माशांचा जीव धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सविस्तर बातमी-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.