'नीट'बाबत कोर्टाचा निर्णय ते शिंजो आबेंचा राजीनामा; दिवसभरातील महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

नीट आणि जेईई परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. कमलनाथ मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठा झटका देऊ शकतात. दुसरीकडे पूर्व दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीसंदर्भात ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. विदेशात, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

एखाद्या राज्याला परीक्षा घ्यायची नसेल तर युजीसीसोबत चर्चा करावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. युजीसीच्या परवानगीशिवाय परीक्षा रद्द करता येणार नाही. राज्यांनी अंतिम वर्षाची परीक्षेची तारीख बदलून त्या घ्याव्यात. परीक्षेचा निर्णय युजीसीने घेतला असून या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सविस्तर बातमी-

100 रुपयांत करा आधार अपडेट; UIDAI ने जारी केली आवश्यक कागदपत्रांची यादी

UIDAI ने कार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीचा खर्च  (charge to update aadhar)याच्या डिटेल्स सांगितल्या आहेत. तसंच आधार अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता (documents need to update aadhar) आहे याची यादीच दिली आहे.  सविस्तर बातमी-

आकड्यांचा खेळ! मध्यप्रदेशात कमलनाथ देणार भाजपला मोठा झटका?

मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण आणखी गरम होण्याची शक्यता आहे. सर्व काही आकड्यांचा खेळ पाहिल्यास कमलनाथ मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला मोठा झटका देऊ शकतात. मध्य प्रदेशात (MP)विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत. त्या २७ जागांवर आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीच्या तारखाही लवकरच जाहीर होतील.  सविस्तर बातमी-

दिल्लीतील दंगलप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप; 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'चा अहवाल प्रसिद्ध

उत्तर-पूर्व दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीसंदर्भात ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ ही मानवी अधिकारांवर काम करणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिगर सरकारी संघटना आहे. दिल्लीतील दंगलीवर या संघटनेने स्वतंत्र चौकशी अहवाल तयार केला आहे. यात दंगल न रोखणे, त्यात सहभागी होणे, फोनवर मागितलेल्या मदतीला नकार देणे. पीडित लोकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखणे, खास करून मुस्लिम समाजाला मारहाण करणे, असे गंभीर आरोप ‘ॲम्नेस्टी ’ने दिल्ली पोलिसांवर केले आहेत.  सविस्तर बातमी-

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा 

जपानचे पंतप्रधान शिंबे आबे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंजो आबे हे आजारी असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यामुळेच शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे आहे. शिंजो आबे यांनी याची औपचारिक घोषणा केली, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. एका आठवड्यात त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सविस्तर बातमी- 

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्यास पाकिस्तानचा नकार

पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याची मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाच्या न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी एखाद्या भारतीय वकिलाला परवानगी देणं आम्हाला कायदेशीररित्या शक्य नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने गुरुवारी दिली आहे.  सविस्तर बातमी- 

सिंहांना मॉर्निंग वॉकला नेलं आणि त्यांच्याच हल्ल्यात अंकल वेस्ट यांचा मृत्यू 

दक्षिण आफ्रिकेतील पर्यावरणवादी (South African conservationist) वेस्ट मॅथ्युसन यांचा सिंहांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दोन पांढऱ्या सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला. सिहांना फिरायला घेऊन गेल्यावर हा प्रकार घडला. वेस्ट यांच्या पत्नीने सांगितलं की, पती आणि सिहांच्या पाठीमागून मी कारने येत होते. त्यावेळी हा हल्ला झाला. सविस्तर बातमी- 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neet jee supreme court japan delhi adhar ugc delhi riot kulbhushan jadhav 28 august