रशियाची लशीबाबत पुन्हा मोठी घोषणा; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येेथे वाचा

देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस तीव्र होत असून शनिवारी एका दिवसात विक्रमी ९०, ६३२ रुग्ण आढळले. दुसरीकडे, पुढील पिढीतील अत्याधुनिक अशा हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्यादृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विदेशातील रशियाने कोरोनाची लस एका आठवण्यात बाजारात आणणार असल्याचं म्हटलं आहे. गरीब देशांना कोरोनाची लस मिळावी म्हणून युनिसेफने मोठी मोहीम हाती घेतली आहे.

VIDEO - भारताच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी; जगात चारच देशांकडे असे तंत्रज्ञान

पुढील पिढीतील अत्याधुनिक अशा हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्यादृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आज स्वदेशी बनावटीच्या आणि स्क्रॅमजेट इंजिनाचे बळ असलेल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉनस्ट्रेटर व्हेईकलची (एचएसटीडीव्ही) यशस्वी चाचणी घेऊन एक मोठा पल्ला गाठला आहे. या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांचे स्वागत केले. सविस्तर बातमी-

'Y' दर्जाची सुरक्षा दिल्याबद्दल कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार 

वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षा प्रकारात 1 किंवा 2 कमांडोसह 11 पोलिस जवानांचा समावेश असतो. गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 सप्टेंबर रोजी कंगना हिमाचल प्रदेशवरुन मुंबईला येणार आहे. सविस्तर बातमी-

देशात कोरोनाचा दुहेरी विक्रम ; एकाच दिवसात ९० हजार नवे रुग्ण

देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस तीव्र होत असून शनिवारी एका दिवसात विक्रमी ९०, ६३२ रुग्ण आढळले. त्यामुळे, भारतातील एकूण कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा टप्पा ओलांडला. मात्र, यापैकी जवळपास ३२ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी एकाच दिवसात ७३, ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यामुळे, देशाचा कोरानामुक्तीचा दर आता ७७ टक्क्यांवर पोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. सविस्तर बातमी-

अखेर 169 दिवसांनी मेट्रो धावली; दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा!

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच महिन्यापासून बंद असलेली दिल्ली मेट्रो (Delhi Metro) पुन्हा एकदा धावण्यास सुरुवात झाली. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडून  मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहनही दिल्ली मेट्रो प्राधिकरणाकडून  (DMRC) करण्यात आले आहे. तीन टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या मेट्रो सेवेत  कंटेन्मेंट झोनमधील स्थानकांचा समावेश करण्यात आलेला नाही. सविस्तर बातमी-

हाँगकाँग पोलिसांची क्रुरता; 12 वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल

हॉंगकॉंग पोलिसांच्या अमानुषतेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही पोलिस एका १२ वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून हॉंगकॉंग पोलिसांना यासाठी नागरिकांच्या रोषाचा सामना कराला लागत आहे. सविस्तर बातमी-

गरीब देशांनाही कोरोना लस वेळेत मिळणार; ‘युनिसेफ’ने घेतली मोठी मोहीम हाती

कोरोना विषाणूविरोधातील लस तयार झाल्यावर जगातील सर्व देशांना ती वेळेवर मिळावी यासाठी या संभाव्य लसींची खरेदी आणि वितरण करण्यात पुढाकार घेणार असल्याचे ‘युनिसेफ’ या संस्थेने जाहीर केले आहे. अशाप्रकारची ही जगातील सर्वांत मोठी आणि वेगवान मोहिम असेल, असेही सूत्रांनी सांगितले. सविस्तर बातमी-

अखेर प्रतिक्षा संपली; रशियाची कोरोना लस याच आठवड्यात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार Russia Covid-19 vaccine केल्याचा दावा करुन रशियाने मागील महिन्यात सगळ्यांनाच आश्चर्याचकित केलं होतं. आता रशियाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील लस आठवड्याभरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध public use होणार असल्याची माहिती देशातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दिले आहे. TASS Russian वृत्त संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. सविस्तर बातमी-
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia corona vaccine kangana ranavat hypersonic missile security unisef