तालिबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना एकत्र जेवणास मनाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

तालिबानचा नवा नियम चर्चेत, महिला-पुरुष, पती पत्नींना एकत्र जेवणास मनाई

अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) सतत नवनवीन नियम लागू करतात. अशातच तालिबानचा एक नवा नियम चर्चेचे कारण ठरलाय. तालिबानने एक विचित्र नियम काढलाय. हा नियम ऐकून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल. या नियमामुळे आता कोणत्याही स्त्री पुरुषाला हॉटेलमध्ये एकत्र भोजन जेवण करता येणार नाही. या निर्णयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा: डॉक्टर निघाला 94 मुलांचा 'बाप', रुग्णांमध्ये स्वत:चे स्पर्म टाकायचा

समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरताना तालिबानने लैंगिक विभाजन करण्याचा निर्णय घेतलाय. या नियमानुसार आता कोणत्याही स्त्री पुरुषाला हॉटेलमध्ये एकत्र जेवण करता येणार नाही. धक्कादायक म्हणजे हे जोडपे पती-पत्नी असले तरीसुद्धा त्यांना एकत्र जेवणाची परवानगी नाही. अफगानमधील वृत्तसंस्था आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त प्रसारीत केले आहे.

हेही वाचा: शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान होणार UAE चे नवीन अध्यक्ष

तेथील रेस्टॉरंटचे व्यवस्थापक पुरूष-स्त्रीला वेगळे बसण्यास सांगत आहे. या लैंगिक भेदाची चर्चा सर्वत्र होत आहे. या निर्णयाचे पडसाद सर्वत्र दिसत आहे. सोशल मीडियावरुन नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले.

Web Title: Taliban Authorities Have Banned Men And Women From Dining Out Together

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top