क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिका आमच्या टप्प्यात: किम जोंग

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

जगातील शांतता आणि स्थैर्याला उत्तर कोरियाकडून धोका निर्माण झाला आहे, असे वक्तव्य प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या नौदलाच्या तळाचे प्रमुख ऍडमिरल हॅरी हॅरिस यांनी केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली.

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाकडून शुक्रवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे अमेरिकेचा मुख्य भाग आमच्या टप्प्यात आल्याचे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी म्हटले आहे.

जपानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने एका महिन्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाने शुक्रवारी पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. जपानच्या किनाऱ्याजवळ हे क्षेपणास्त्र कोसळले. त्याबाबतच्या माहितीचे आम्ही विश्‍लेषण करत आहोत. 

जगातील शांतता आणि स्थैर्याला उत्तर कोरियाकडून धोका निर्माण झाला आहे, असे वक्तव्य प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या नौदलाच्या तळाचे प्रमुख ऍडमिरल हॅरी हॅरिस यांनी केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली. अमेरिकेने वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियाने आपला आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला असून, क्षेपणास्त्र चाचण्या घेण्याचा सपाटा लावला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: US Mainland Within Reach,' Says North Korea After Second Missile Test