Night shower benefit in Marathi | उन्हाळ्यात रात्री आंघोळ केल्याने शरीर, मनावर होतात असे परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Night shower benefit in Marathi

उन्हाळ्यात रात्री आंघोळ केल्याने शरीर, मनावर होतात असे परिणाम

रोज आंघोळ करणे शरीरासाठी आवश्यक असते. यामुळे वैयक्तिक स्वच्छता तर सुधारतेच, पण मनालाही ताजेपणाही मिळतो. उन्हाळ्यात खूप घाम येत असल्याने लोकांना जास्त वेळा आंघोळ करायला आवडते. अनेकजण संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर आंघोळ करतात. तर काहींना झोपण्यापूर्वी आंघोळ करणे आवडते. आहोत. दिवसभराच्या धावपळीनंतर शरीर आणि मन थकते. अशावेळी रात्री अंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. रात्री आंघोळ केल्याने शरीराला ५ फायदे होतात. (Night shower benefit in Marathi)

हेही वाचा: Balance The Diet: गोड, कडू, तुरट या चवी उन्हाळ्यातील आहारात का महत्वाच्या?

slee

slee

रात्री आंघोळ करण्याचे पाच फायदे

१) शांत झोप येईल- अनेक लोकांना रात्री अंघोळ करण्याचा कंटाळा येतो.पण, रात्री अंघोळ केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे मूडही फ्रेश होतो, रात्री झोपायला त्रास होत नाही आणि शांत झोप लागते.

हेही वाचा: पुरूषांना येतो स्त्रियांपेक्षा जास्त घाम!अशी आहेत कारणं

High BP

High BP

२) रक्तदाब नियंत्रणात- रात्री आंघोळ केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का? हे खरं आहे. कारण ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांनी रात्री आंघोळ केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

हेही वाचा: उन्हाळ्यात प्या Detox Drink| Summer Health

Weight Loss Tips

Weight Loss Tips

३) वजन होईल कमी- जेव्हा तुम्ही खूप गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे आपले वजन कमी होते. पण आपल्या त्वचेला नुकसान पोहोचेल इतके पाणी गरम घेऊ नये. शरीराला जितके सहन होईल तितकेच गरम पाणी वापरावे. रात्री अंघोळ केल्याने जास्त कॅलरी बर्न होत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा: Protein Shake पिताय! त्यामुळे होणारे ४ परिणाम जाणून घ्या

४) रक्तप्रवाह वाढेल- रात्री जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे शरीराचा थकवा दूर होतो, तसेच झोपही चांगली येते. जर तुम्हाला रात्री थकवा जाणवत असेल तर गरम पाण्याने अंघोळ करणे हा एक चांगला उपाय आहे

हेही वाचा: Tight Jeans घालायला आवडते! 5 परिणाम वाचा

५) त्वचेच्या समस्या होतील दूर -तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर रात्री अंघोळ करणे अतिशय चांगले आहे. असे केल्याने पिंपल्स, कोरडी, निर्जीव त्वचा असल्यास या समस्या दूर होतील. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होईल. रात्री आंघोळ केल्यानंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर लावून मग झोपा. तसेच जेव्हा तुम्ही बाहेरून घरी परत याल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा.

Web Title: Summer Bathing At Night Health Benefits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :summerBathBenefitsSleep
go to top