esakal | गर्भाशय ग्रीवा व स्तनाच्या कॅन्सरविषयी भारतीय तरुणाईला माहीतच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

   Young are unaware of breast and Cervix cancer

- 60% पेक्षा जास्त तरुणांना सर्व्हिकल कॅन्सरबद्दल माहीत नव्हते, 50% पेक्षा जास्त तरुणांना ह्या रोगासाठी प्रमुख कारण ठरणार्‍या ह्युमन पॅपिलोमाव्हायरस बद्दल माहीत नव्हते.
- स्तनाच्या कर्करोगाची प्रारंभिक लक्षणे ओळखण्यासाठीच्या ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन’ बाबत सहभागी अनभिज्ञ.

- जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई आणि BLK हॉस्पिटल, दिल्ली यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तरुणांमध्ये कर्करोग व त्याचे उप-प्रकार याबाबत जागरूकता आणण्याची आत्यंतिक निकड आहे.

गर्भाशय ग्रीवा व स्तनाच्या कॅन्सरविषयी भारतीय तरुणाईला माहीतच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सर्व्हिकल आणि ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कॅन्सर असला तरी, भारतातील तरुणांना त्याबद्दल फारच कमी माहिती आहे अशी माहिती जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई आणि BLK हॉस्पिटल, दिल्ली यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे.

फॅब-अ‍ॅब : होल्ड दॅट कोअर टाइट...

डहाणूकर कॉलेज आणि साठ्ये कॉलेज येथे योजण्यात आलेल्या सर्वेक्षणात 18 ते 21 या वयोगटातील 375 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिल्लीत, BLK हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरातील व विविध कॉलेजांमधील 16-24 वयोगटातील 220 तरुणांनी ऑनलाइन प्रश्नावलीमार्फत प्रतिसाद दिला.

काय म्हणता ! कुष्ठरोगाचे निर्मुलन झाले...मग हे सहा हजार रुग्ण आले कुठून?

''भारतीय तरुणांमध्ये कर्करोग ओळखण्याबाबत व त्याच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याबाबत जागरूकता आणण्याची गरज आहे, कारण, तरच आपण कॅन्सर निर्मूलन करण्याच्या ध्येयाच्या दिशेने कूच करू शकू.'' असेही या अहवालात म्हटले आहे.

माझा फिटनेस : शिस्तबद्धता - आरोग्याची गुरुकिल्ली

मुंबईत प्रश्नावलीला प्रतिसाद देणार्‍यांमध्ये महिलांची संख्या (65%) पुरुषांपेक्षा (35%) जास्त होती, तर दिल्लीत मात्र महिलांपेक्षा (31%) पुरुष प्रतिसादकांनी (69%) अधिक उत्साहाने प्रतिसाद दिला. परंतु, या तरुणांमध्ये आढळलेली एक सर्वसामान्य गोष्ट म्हणजे, गर्भाशय ग्रीवा आणि स्तन या अवयवांना प्रभावी करणार्‍या कॅन्सरच्या सर्वात सामान्य उपप्रकारांबद्दल तरुणांमध्ये फारशी माहिती नव्हती. जवळजवळ अर्ध्या सहभागी महिला असूनही मुंबईतील 58% आणि दिल्लीतील 60% सहभागींनी सांगितले की, त्यांना गर्भाशय ग्रीवेच्या कॅन्सरबद्दल माहिती नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) मते 70% सर्व्हिकल कॅन्सर व प्री-कॅन्सरस सर्व्हिकल लीजन्ससाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) जबाबदार असतो. असे असूनही मुंबईतील 58% आणि दिल्लीतील 71% विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यास मात्र HPV अपयशी ठरला होता.

फॅब-अ‍ॅब : शरीराची ठेवण सुधारण्यासाठी...

तरुणांना तोंडाचा कॅन्सर व सामान्य कॅन्सर्सबद्दल मात्र चांगली माहिती होती, ज्याचे कारण, बहुधा राज्य व केंद्र सरकारद्वारे जोरात चालवण्यात येणार्‍या तंबाखू-विरोधी मोहिमा हे असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे पडले. या दोन्ही शहरांमधील 80% पेक्षा जास्त सहभागींना तंबाखू व दारूचा तोंडाच्या कॅन्सरशी असलेला थेट संबंध माहीत होता. धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन  केल्याने तणाव दूर होतो किंवा चित्त एकाग्र होते या चुकीच्या कल्पना असल्याचे बहुतांशी लोकांनी मान्य केले.  या सर्वेक्षणाच्या अहवालाबद्दल चर्चा करताना नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील ऑन्कोसर्जरी विभाग प्रमुख डॉ. संजय दुधाट म्हणाले की ऑन्कोलॉजिस्ट, निर्णय घेणारे लोक व या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था (NGO) यांना कॅन्सरबाबतची जागरूकता कोणत्या विशिष्ट बाबतीत आणण्याची गरज आहे, हे ओळखण्यास या सर्वेक्षणाची मदत होईल.

ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी...

डॉ. दुधाट म्हणाले, “आपण नेहमी म्हणतो की मागाहून उपचार करण्यापेक्षा आधीच प्रतिबंध करणे केव्हाही अधिक योग्य असते आणि हे कॅन्सरच्या बाबतीत देखील खरे आहे. आता आपल्याला हे माहीत आहे की, HPV तसेच त्याचा प्रसार आणि लसीकरण, पॅप-स्मीयर टेस्ट, SBE आणि क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन याबद्दलच्या महितीचा प्रसार होणे गरजेचे आहे, त्यामुळे सामाजिक पातळीवर आपण या विषयांवर लक्ष केन्द्रित करू शकतो. चला, या जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आपण एक निरोगी जीवन जगण्याची, संतुलित व पोषक आहार घेण्याची, चांगला व्यायाम, योग, ध्यान करण्याची आणि तंबाखू, दारू व भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याची शपथ घेऊ या.”

गुडघेदुखीपासून मुक्तता!

BLK कॅन्सर सेंटर येथील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे संचालक आणि रोबोटिक सर्जरीचे प्रमुख डॉ. सुरेंदर डबास यांनी आकडेवारी मांडून खूप प्रारंभीच निदान होण्याच्या लाभांबाबत जागरूकता आणण्याची गरज असल्याचे सांगत म्हटले, “जागरूकतेच्या अभावी बर्‍याचदा निदान होण्यास विलंब होतो