Obesity and Eye Health: लठ्ठपणा आणि डोळ्यांच्या आरोग्याचा काय आहे संबंध? वेळीच काळजी कशी घ्यायची जाणून घ्या

How Obesity Is Associated With Eye Health: लठ्ठपणा आणि लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह या आजारांचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
How Obesity Affects Vision
Obesity And Eye HealthSakal
Updated on

थोडक्यात:

  1. भारतात लठ्ठपणा ही गंभीर आरोग्य समस्या बनत असून त्याचा परिणाम दिसण्याबरोबरच आरोग्यावर होतो.

  2. लठ्ठपणा आणि त्यातून होणारा मधुमेह डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो.

  3. अशा व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू आणि ग्लूकोमा यांसारख्या डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो.

Eye Diseases Caused Due To Obesity: सध्या भारतात लठ्ठपणा ही एक वाढती समस्या आहे. ही समस्या फक्त तुमच्या दिसण्यावर किंवा बाह्य सौंदर्यावरच परिणाम करत नाही, तर ही एक आरोग्याविषयक गंभीर समस्या आहे.

लठ्ठपणा म्हटलं की आपल्याला लगेच मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी असे आजार डोळ्यासमोर येतात. पण डोळ्यांचे काय? फार क्वचित लोकांना माहीत आहे की, लठ्ठपणा आणि लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह या आजारांचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

त्यामुळे लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू, आणि ग्लूकोमा (काचबिंदू) यासारख्या डोळ्यांच्या आजारांचा धोका जास्त असतो. म्हणून त्यांची योग्य काळजी आणि नियमित तपासणी केल्यास या समस्या टाळता येतात किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

How Obesity Affects Vision
Natural Hair Care: सर्व केसांच्या समस्यांवर 'या' नैसर्गिक घटकाचा होतो कमाल परिणाम! आजच वापरायला सुरुवात करा

लठ्ठपणामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy)

लठ्ठपणा हा टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढवतो, ज्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता निर्माण होते. जे दृष्टी कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे.

काचबिंदू (Glaucoma)

लठ्ठपणा डोळ्यांच्या आतील उच्च दाबाशी संबंधित आहे. जो ग्लूकोमा (काचबिंदू) साठी असलेला एक मुख्य धोका आहे, हा रोग ऑप्टिक नर्व्हला नुकसान पोहोचवतो.

वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन (AMD)

लठ्ठपणामुळे AMD होण्याचा धोका वाढू शकतो. हा आजार डोळ्यांच्या मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम करतो.

मोतीबिंदू (Cataracts)

लठ्ठपणा मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढवतो. ज्यामुळे या स्थितीत डोळ्याच्या लेन्सवर धुरकटपणा निर्माण होतो.

फ्लॉपी आयलीड सिन्ड्रोम (Floppy Eyelid Syndrome)

लठ्ठपणामुळे फ्लॉपी आयलीड सिंड्रोम होण्याची शक्यता असते. या स्थितीत पापण्या शिथिल होतात, ज्यामुळे डोळ्यांना जळजळ होणे आणि दिसायला त्रास होणे हे होऊ शकतो.

ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome)

लठ्ठपणा या ड्राय आय सिंड्रोमशी संबंधित असू शकतो. ज्यामध्ये डोळे पुरेसे अश्रू तयार करत नाहीत आणि जरी ते तयार झाले तरी खूप लवकर सुकतात.

रेटिनल व्हेन ऑक्लुजन (Retinal Vein Occlusion)

लठ्ठपणा रेटिनल व्हेन ऑक्लुजनचा धोका वाढवतो, ही अशी स्थिती आहे जिथे रेटिनामधील (डोळयातील पडदा) रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.

How Obesity Affects Vision
Best Time To Wake Up: शास्त्रानुसार उत्तम आरोग्यासाठी सकाळी किती वाजता उठले पाहिजे? तज्ञ सांगतात...

लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

नियमित डोळ्यांची काळजी

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी एकदा सखोल डोळ्यांची (डायलेटेड आय एक्झाम) तपासणी करून घ्यावी. तर लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब आणि ग्लूकोमा यांसारख्या डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे

ब्लड शुगर (Blood Sugar) कमी जास्त होत असल्यास डोळ्यांतील रक्तवाहिन्या खराब होऊन डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता वाढते. तसेच जास्त ब्लड शुगरमुळे डोळ्यांच्या लेन्संना सूज येऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. मात्र, संतुलित आहार, योग्य औषधोपचार आणि नियमित व्यायाम यामुळे साखरेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.

रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे योग्य व्यवस्थापन

लठ्ठपणा आणि मधुमेह यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढू शकतो, ज्याचा परिणाम डोळ्यांवरील रक्तवाहिन्यांवर होतो. यामुळे दृष्टिदोष, रेटिनल ब्लॉकेजेस इत्यादी होऊ शकतात. त्यामुळे याची नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपाय करणे आवश्यक आहे.

संतुलित आहार घ्या

पालेभाज्या, फळे आणि सुका मेवा यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतात. ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स (जे माशांमध्ये जास्त आढळतात) देखील डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. साखर आणि अनावश्यक चरबीयुक्त अन्नपदार्थ टाळले तर मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहतो आणि परिणामी डोळ्यांच्या आजारांचा धोका देखील टाळता येतो.

नियमित व्यायाम करा

नियमीट शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रणात राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा थेट फायदा डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. चालणे, पोहणे, योगासारखे हलके व्यायाम प्रभावी ठरू शकतात.

How Obesity Affects Vision
Vitamin B12: शाकाहारी आहारातून मिळवा व्हिटॅमिन B12 अन् वाढवा शरीराची ताकद!

धूम्रपान बंद करा

धूम्रपानामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ,ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, परिणामी डोळ्यांचे विविध गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. मधुमेह आणि लठ्ठपणाने प्रभावित व्यक्तींनी धूम्रपान (Smoking) पूर्णपणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

FAQs

  1. लठ्ठपणाचा डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
    (How does obesity affect eye health?)
    लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता जास्त असते, ज्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी, ग्लूकोमा, मोतीबिंदू आणि इतर दृष्टिदोष होण्याचा धोका वाढतो.

  2. लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे कोणते डोळ्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो?
    (Which eye diseases are more common in people with obesity and diabetes?)
    अशा व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू, ग्लूकोमा, वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन, ड्राय आय सिंड्रोम, फ्लॉपी आयलीड सिंड्रोम आणि रेटिनल व्हेन ऑक्लुजन होण्याची शक्यता जास्त असते.

  3. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी?
    (How should people with obesity take proper care of their eyes?)
    नियमित डोळ्यांची तपासणी, ब्लड शुगर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे आणि धूम्रपान टाळणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

  4. आहार आणि जीवनशैलीत बदल करून डोळ्यांचे आजार कसे टाळता येतील?
    (How can dietary and lifestyle changes help prevent eye diseases?)
    पालेभाज्या, फळे, सुका मेवा, आणि ओमेगा-३ युक्त पदार्थ खाणे, साखर आणि चरबीयुक्त अन्न टाळणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि धूम्रपान टाळल्यास डोळ्यांचे अनेक आजार टाळता येतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com