Rahul Gandhi Pune : राहुल गांधी म्हणतात, 'माझे मोदींवर प्रेम'; पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद

शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 5) हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदींनी राहुल गांधींची भेट घेतली. 'भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या?' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला.

'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करतो. ते मात्र माझा द्वेष करत असतील तर काही अडचण नाही,' असे एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी विद्यार्थी संवाद कार्यक्रमात यांनी म्हटले. यानंतर विद्यार्थ्यांनी अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले अन् मोदी, मोदी च्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. या संवाद कार्यक्रमाला आर जे मलिश्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी सूत्रसंचलन केले. 

वाचा संबंधित बातम्या :
Rahul Gandhi Pune : 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांची राहुल गांधींसह 20 मिनिटे चर्चा
Rahul Gandhi Pune : संवाद साधण्यासाठी शेकडो विद्यार्थी हजर​
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींवर बायोपिक करणार : सुबोध भावे​
Rahul Gandhi Pune : 'पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचे श्रेय फक्त हवाई दलाचे'​
Rahul Gandhi Pune : विद्यार्थ्यांनी दिल्या मोदी मोदीच्या घोषणा​