अंध मुलांनी फोडली दहीहंडी; जुनी सांगवीत सामाजिक उपक्रम

रमेश मोरे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

या मरणोत्तर नेत्रदान शिबिरास प्रतिसाद देत १०८ नागरीकांनी रूबी हाँलचे नेत्रचिकित्सक डॉ. आबा ढोकळे यांच्याकडे स्वईच्छा मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून दिले.

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत अंध मुलांना दहीहंडी उत्सवाला पाचारण करण्यात आले. गोविंदा आला रे आला. . वंदेमातरम च्या जयघोषात मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांच्या साथीने या अंध मुलांनी दहीहंडी फोडत उत्सव साजरा केला.

साम्राज्य प्रतिष्ठान व साम्राज्य वाद्यपथकाच्या वतीने दरवर्षी आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मंडळाचे श्री अमर नाईक यांच्या संकल्पनेतुन अंध मुलांना या उत्सवात सहभागी करून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी या उत्सवात पहिल्यांदाच सहभागी होत असुन यामुळे सर्वांसोबत या उत्सवाचा आनंद मिळत आहे. अशा भावना व्यक्त केल्या. प्रतिष्ठानच्या वतीने रूबी हाँल नेत्रपेढीच्या सौजन्याने मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन नागरीकांना केले होते.

या मरणोत्तर नेत्रदान शिबिरास प्रतिसाद देत १०८ नागरीकांनी रूबी हाँलचे नेत्रचिकित्सक डॉ. आबा ढोकळे यांच्याकडे स्वईच्छा मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज भरून दिले. याचबरोबर अंध विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व जिवनावश्यक वस्तुंचे संकलन करण्यात आले होते. सहभागी झालेल्या ममता अंध व अनाथ कल्याण केंद्रातील अंध विद्यार्थ्यांना या वस्तु भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संयोजन तेजस तनपुरे, करण कासुरगे यांनी केले. अंध मुलांच्या या दहीहंडी उत्सवास सांगवीकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news old sangvi blind govindas dahihandi