

Sanju Samson - Ruturaj Gaikwad | Ravindra Jadeja| RR vs CSK | IPL 2026
Sakal
RR vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सोमवारी (३० मार्च) खेळवला जात आहे. गुवाहाटीत होणारा हा सामना दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी भावनिक आहे.
कारण या सामन्यापासून संजू सॅमसन (Sanju Samson) चेन्नई सुपर किंग्ससाठी, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. या दोघांची आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी ट्रेडिंगच्या मार्फत या दोन्ही संघांमध्ये आदलाबदली झाली होती.
दरम्यान, संजू सॅमसन आणि जडेजा हे दोघेही या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. त्यामुळे सॅमसनचा हा चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) पदार्पणाचा सामना आहे, तर जडेजाचा राजस्थानकडून (Rajasthan Royals) पुनरागमनाचा सामना आहे. २००८ मध्ये जडेजाने राजस्थानसाठी पदार्पण केलं होतं.