
आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने आता अंतिम टप्प्यात असून लवकर प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. त्यानंतर २५ मे रोजी अंतिम सामना होणार असून या दिवशी दोन सर्वोत्तम संघ आमने-सामने येतील. त्यापैकी एक संघ चॅम्पियन होणार आहे.
मात्र, हे दोन संघ नेमकं कोणते असतील? हे निश्चित झालेलं नाही. मात्र, विजेता कोण असेल? यावर शिक्कामोर्तब झाल्याचं निश्चित झाल्याचा दावा केला जातो आहे. खंरतर त्यासाठी एक योगायोग कारणीभूत ठरला आहे.