लाईव्ह न्यूज

Must Watch Video : तणाव, चिंता, भीती! पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंसाठी विशेष 'Vande Bharat Train'; सुखरूप दिल्लीत दाखल

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 मध्ये सहभागी असलेल्या पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाच्या खेळाडूंना विशेष ‘वंदे भारत’ ट्रेनने दिल्लीला हलवण्यात आले.
PBKS & DC Players Reach Delhi
PBKS & DC Players Reach Delhi esakal
Updated on: 

Special Vande Bharat Train for Punjab Kings & Delhi Capitals Players : पाकिस्तानने गुरुवारी रात्री अचानक भारताच्या सीमाभागांवर हल्ला चढवल्यानंतर धर्मशाला येथील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द केला गेला. बीसीसीआयने अत्यंत चतुराईने सर्व परिस्थिती हाताळली आणि फ्लडलाईटमध्ये बिघाड असल्याचे सांगून मॅच थांबवली. आयपीएल चेअरमन अरुण धुमाल व पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा हे प्रेक्षकांना स्टेडियम रिकामी करण्याची विनंती करताना दिसले. विमानतळ बंद असल्याने खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अम्पायर, ब्रॉडकास्टर टीम या सर्वांना दिल्लीत सुरक्षित घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयने विशेष ट्रेनची सोय केली होती. हे सर्व खेळाडू सुखरूप दिल्लीत पोहोचले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com