
सोमवारी (२८ एप्रिल) १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याची दखल घ्यायला लावली. इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना त्याने तुफानी शतक केले. त्याच्या या शतकामुळे राजस्थानने ८ विकेट्सने सहज विजय देखील मिळवला.