

California almonds
esakal
-रितिका समद्दार
मॅक्स हेल्थकेअर (नवी दिल्ली) येथील डाएटेटिक्स प्रादेशिक प्रमुख
"आरोग्याची सुरुवात पोटापासून होते," ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर, आपल्या पोटाचा थेट संबंध 'गट मायक्रोबायोम'शी (Gut Microbiome) असतो. म्हणजेच आपल्या पोटात अब्जावधी चांगले आणि फायदेशीर बॅक्टेरिया (जिवाणू) असतात, जे अन्न पचनासोबतच संपूर्ण शरीराचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच आपला दररोजचा आहार कसा आहे, याला अत्यंत महत्त्व आहे.