esakal | संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' आहेत चार शक्यता

बोलून बातमी शोधा

Akola News Sanjay Rathore resignation Sanjay Raimulkar and Gopikishan Bajoria  discussed of Minister.}

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे. 

संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' आहेत चार शक्यता
sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला:  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रीपद कुणाला मिळणार यासाठी आता लॉबिंग सुरु झालं आहे. 

मंत्रिपदाच्या शर्यतीत पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळणार की मुंबईला? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातून मंत्रिपद गेल्यानंतर मंत्रिपद पुन्हा पूर्व आणि पश्चिम विदर्भाला मिळालं पाहिजे, असा जोर येथील नेत्यांचा आहे. 

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचे विधानसभेत तीन तर विधानपरिषदेत एक सदस्य आहे.

पश्चिम विदर्भाचा विचार केला तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिमचे पारडे जडच आहे. दुसरीकडे सामाजिक समीकरण लक्षात घेऊन यवतमाळमधील संजय राठाेड यांना मंत्रिपदाची संधी मिळाली हाेती, हे लक्षात घेणं क्रमप्राप्त राहील.

हेही वाचा - अजितदादा दिलेले आश्वासन पाळणार का?

निकटवर्तीयांना मिळणार संधी?
मंत्रीपदाबाबत दुसरी शक्यता म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय समजले जाणारे नेते, आमदार यांनाही संधी मिळू शकते. म्हणजे मुंबईला हे मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

मिळणार अतिरिक्त भार? 
मंत्रीपदाबाबत तिसरी शक्यता म्हणजे, मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यावर या विभागाचा अतिरिक्त भार दिला जाऊ शकतो. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्या आधीच विविध नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु नसेल तर नवलंच!

नवा चेहरा
मंत्रीपदाबाबत चौथी शक्यता म्हणजे,  विदर्भातच मंत्रीपद देण्याचा निर्णय झाल्यास संजय रायमूलकर, गोपीकिशन बाजोरिया आणि नितीन देशमुख यांच्यात स्पर्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यमंत्र्यांना मिळणार कॅबिनेटचा दर्जा
मंत्रीपदाबाबत रस्सीखेच वाढली तर सध्याचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन विदर्भातील आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

 

आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ

 

जी.श्रीकांत गेले ; राहुल रेखावार महाबीजचे नवे एमडी

 

बुलाती है मगर जाने का नही, प्रतिष्ठीत पुरुषांना अडकविण्यासाठी रचला जातो हनी ट्रॅप

 

अकोला-अकोट रस्त्याचे काम सुरू न केल्याने प्रशासनाचे कठोर पाऊल

 

मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर