esakal | Corona Update : रुग्णसंख्या तीन हजारांखाली, राज्याला मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates nashik

Corona Update : रुग्णसंख्या तीन हजारांखाली, राज्याला दिलासा

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 2,692 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,59,349 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 2,716 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

हेही वाचा: लखीमपूर : शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रयत्न - शरद पवार

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,80,670 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.28 टक्के एवढं झालं आहे.

हेही वाचा: Rave Party : आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!

दरम्यान, आज राज्यात 41 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळं मृतांचा एकूण आकडा 1,39,207 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 35,888 इतकी आहे.

हेही वाचा: लहान मुलांचं लसीकरण; 'या' मुलांना मिळणार पहिल्यांदा लस

नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4, नाशिक 22, पुणे 10, कोल्हापूर 4, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,43,152 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

loading image
go to top