Covid Update: राज्यात 146 नव्या रुग्णांची नोंद! आज JN.1 व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही

राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत माहिती दिली आहे.
covid 19 updates
covid 19 updatesesakal

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. आजही १४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये नव्या JN.1 व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. (Covid Update 146 new patients registered in Maharashtra today there are no patients with the JN.1 variant)

covid 19 updates
Arun Govil: अरुण गोविल यांना मिळालं प्रतिष्ठापणेचं निमंत्रण! रामाच्या भूमिकेनं केलं होतं जनतेवर गारुड

JN.1 चा एकही रुग्ण नाही

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२९ उपचार घेणारे रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सध्या नव्यानं आढळून आलेला JN.1 व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पण अद्याप या व्हेरियंटची लागण झालेले ११० रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ९१४ इतकी आहे. (Latest Marathi News)

covid 19 updates
Himayat Beg : पुण्यातली जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी जन्मठेप भोगणाऱ्या हिमायत बेगला जामीन मंजूर; काय आहे प्रकरण जाणून घ्या

दरम्यान, आज १४,३७९ रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली. यांपैकी २४४२ जणांची आरटीपीसीआर चाचणी तर ११८३७ जणांची रॅट टेस्ट करण्यात आली. त्यामुळं आजचा पॉझिटिव्हिटी रेट १.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

covid 19 updates
Fadnavis on Sharad Mohol: "कुख्यात गुंड कोणीही असो, बंदोबस्त करावा लागतो"; मोहोळ गोळीबार प्रकरणावर फडणवीसांचं विधान

सध्या ८७० रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर काल रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण ४४ आहेत. यांपैकी सर्वसाधारण वॉर्डमध्ये ३२ तर आयसीयूमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com