गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
Sunday, 8 September 2019

Chandrayaan 2 : ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो... ‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील... सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्यायाधीश गुप्ता... किल्ले भाड्याने देण्याच्या विषयावर अखेर बोलले राज ठाकरे!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

Chandrayaan 2 : ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो... ‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील... सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्यायाधीश गुप्ता... किल्ले भाड्याने देण्याच्या विषयावर अखेर बोलले राज ठाकरे!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- ईशान्येतील Article 371 ला हात लावणार नाही : अमित शहा

राज्यघटनेतील 370 वे कलम हे तात्पुरतेच होते; पण 371 वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे.

(सविस्तर बातमी)

- Chandrayaan 2 : ‘विक्रम’ अभी जिंदा है! यानाने काढले लँडरचे फोटो

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे तमाम भारतीयांची निराशा झाली होती. पण, भारतीयांसाठी समाधानाची बाब म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला आहे.

(सविस्तर बातमी)

- पाकमधून 200 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत

काश्‍मीरमध्ये दहशतवादी सक्रिय असल्याचे अजित डोवाल यांनी सांगतानाच केंद्र सरकार आणि सुरक्षा दल हे प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.

(सविस्तर बातमी)

- ‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील

अनेक राजकीय आणि वादग्रस्त खटल्यांमध्ये वकिली करणारे भारतातील ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांचे आज सकाळी नऊच्या सुमारास निधन झाले. नवी दिल्ली येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(सविस्तर बातमी)

- सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्यायाधीश गुप्ता

सरकारवरील टीकेला देशद्रोह ठरवल्यास देशातील परिस्थिती कठीण होईल.

(सविस्तर बातमी)

- किल्ले भाड्याने देण्याच्या विषयावर अखेर बोलले राज ठाकरे!

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन गड किल्ल्यांचा विकास करण्याच्या नावाखाली लग्न समारभांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. त्यावर राज्यातील सर्वच स्तरांतून टिका झाली आहे.

(सविस्तर बातमी)

- मोदी सरकारमधील मंत्रीच म्हणतात, 'जीएसटी, नोटाबंदीमुळे आर्थिक मंदी'

देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली केंद्र सरकारमधील एका नेत्याने दिली.

(सविस्तर बातमी)

- दुसऱ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले? तर आता घाबरू नका...

ट्रान्सफर झालेले पैसे अनेकदा परत मिळतात तर कधी मिळतही नाही. मात्र, आता चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत मिळू शकतात.

(सविस्तर बातमी)

- Video : अमृता खानविलकर का घेतीय जिममध्ये मेहनत?

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. हिंदी-मराठी सिनेमांमध्ये तिनं आपला ठसा उमटवलाय. केवळ मराठीच नव्हे तर, अमराठी नागरिकही तिचे मोठे फॅन आहेत.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important marathi news of 8th September 2019