माळा काढलेल्यांना तिसऱ्या लाटेत कोरोना गाठणार - इंदुरीकर महाराज

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
kirtan
kirtanesakal
Summary

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सध्या देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोनासह नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनचा सामना करत आहे. प्रशासनाने यावर खबरदारी म्हणून उपाययोजनांची अमंलबजावणी चालु केली आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांत अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून याची तीव्रता तुलनेत कमी असल्याचं सांगितलं जातं आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्याने तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे, असं वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. लातूरमध्ये आयोजित एका कीर्तनात ते बोलत होते. तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हसत हसत जगा असा उपदेश दिला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यांने आता पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

kirtan
'राज्यसरकार असेल थंड; आता आम्हीच पुकारू बंड'

दरम्यान, मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे. कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी नाही, मात्र ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार असल्याचं आणखी एक विधान इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, 'डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले' असं यावेळी सांगितल. यमानं जर लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही असं त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही. असेही इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं होतं.

kirtan
लसीकरणाबाबत भ्रम पसरवणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा; मोदींचं आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com