काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बाळासाहेब थोरात यांची बैठक होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर बैठकीत चर्चा होणार असून पक्षाची आगामी रणनीती यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.