हिंदूंच्या सणांबाबत कायमस्वरूपी तोडगा हवा: उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

एकनाथ खडसेंचे कधीही कमबॅक होऊ शकते. ते कोणाला ही कधीही घेऊ शकतात. झोटिंग अहवाल पारदर्शी असावा, सगळ्यांसमोर येऊ द्या. त्यांना वाटेल तेव्हा वाल्या, वाटेल तेव्हा वाल्मिकी करतील.

मुंबई - दही हंडी, गणपती असे हिंदूचे उत्सव येत आहेत. नवे कायदे येतात, रेड अलर्ट येतात मग उत्सव जीव मुठीत घेऊन करावे लागतात. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. 

रवींद्र वायकर यांच्या बंगल्यात शिवालय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंच्या सणांमध्ये येत असलेल्या अडचणींबद्दल वक्तव्य केले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, की उद्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बैठक आहे, यावर तोडगा निघाला पाहिजे अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. मशिदीच्या भोंग्याबाबत कुणी आवाज काढत नाहीत ते तर वर्षभर असतात. आमचे उत्सव वर्षातून एकदा असतात. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून उत्सव नको हे नक्की. प्रत्येक वेळा कायद्याची बंधन आमच्यावरच का लादली जातात. यावर तात्पुरती मलमपट्टी नाही तोडगा काढला पाहिजे. 

सरपंच थेट निवडणुकीबाबत नीट विचार व्हायला हवा. फायदे, तोटे याचा आढावा घेतला पाहिजे. वेगवेगळे लोक निवडून आले की गोंधळ होतो. सरपंच जर लोकांमधून निवडून येत असेल तर मुख्यमंत्री का नाही असे लोक विचारतील, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. एकनाथ खडसेंचे कधीही कमबॅक होऊ शकते. ते कोणाला ही कधीही घेऊ शकतात. झोटिंग अहवाल पारदर्शी असावा, सगळ्यांसमोर येऊ द्या. त्यांना वाटेल तेव्हा वाल्या, वाटेल तेव्हा वाल्मिकी करतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगाविला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra news Uddhav Thackeray talked on Hindu festival