रिक्तपदांमुळे राज्य परिवहन विभागाचा कारभार मंदावला; अनेक महत्वाची पदे अतिरिक्त प्रभारावर...

प्रशांत कांबळे 
Monday, 3 August 2020

राज्यातील कोल्हापूर, नागपूर ग्रामीण, मुंबई मध्य, औरंगाबाद आणि धुळे येथील आरटीओची पद रिक्त असल्याने, या 5 प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे काम सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीच सांभाळत आहे.

मुंबई : राज्य अपघातमुक्त व्हावे आणि नव्या मोटार वाहन कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहे. मात्र, राज्य परिवहन विभागाच्या परिवहन आयुक्त कार्यालयातील आयुक्त दर्जाचे 8 तसेच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची 5 असे एकूण 13 पद रिक्त असल्याची समोर आले आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रभारावर राज्य परिवहन विभागाचा कार्यभार सुरू आहे. त्यातही रस्ता सुरक्षा अभियानाचे पदही रिक्त असल्याने महसुलावर परिणाम होत आहे.   

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....

राज्यातील कोल्हापूर, नागपूर ग्रामीण, मुंबई मध्य, औरंगाबाद आणि धुळे येथील आरटीओची पद रिक्त असल्याने, या 5 प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे काम सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीच सांभाळत आहे. निवृत्तीमुळे तसेच प्रतिनियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांचे पद पदोन्नतीने भरायचे असते. त्यासाठी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका वेळोवेळी घेणे सुद्धा आवश्यक असते. मात्र, बैठका होत नसल्याने समोर आले आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री ऍड.अनिल परब, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचा 'मोठा' खुलासा, उघड केली 'ही' माहिती...

रस्ता सुरक्षेचे मुख्य पद रिक्त 
अपघातमुक्त राज्य करण्यासाठी राज्य सरकारने रस्ता सुरक्षा अभियान सुरू केले आहे. त्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि उप परिवहन आयुक्त असे दोन पद निर्माण करण्यात आले आहे. या पदांवर राज्य परिवहन विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही पदे रिक्त असल्याने रस्ता सुरक्षा अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. 

महसूलात घट
रस्त्यांवरील वाहनांच्या तपासणीवेळी आकारण्यात येणाऱ्या दंडातून मिळणाऱ्या महसूल राज्याच्या तिजोरीत जातो. राज्याच्या महसूलात राज्य परिवहन विभागाचा मोठा वाटा असतो. मात्र, रिक्त पदांमुळे महसूलावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

गणेश उत्सव २०२० : 'हा' बाप्पा दरवर्षी मुंबई ते काश्मीर करतो प्रवास, यंदाही परंपरा अखंडित...

अतिरिक्त कारभार असलेले अधिकारी
मुंबई पश्चिमचे आरटीओ अभय देशपाडे यांच्याकडे उपपरिवहन आयुक्त पदासह इतरही पदांचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्याशिवाय पनवेलचे आरटीओ लक्ष्मण दराडे यांच्याकडे उपपरिवहन आयुक्त अंमलबजावणी 2 पदाचा अतिरिक्त कारभार आहे. मुंबई पूर्व येथील डेप्युटी आरटीओ प्रकाश जाधव यांच्याकडे राज्यातील न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करण्याबाबत अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यासोबतच डेप्युटी आरटीओ संदेश चव्हाण यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून उपआयुक्त संगणक पदाचा कारभार आहे. आणि राज्यातील पाच आरटीओंची पद रिक्त असून डेप्युटी आरटीओ अधिकारीच काम सांभाळत आहे. 
 

विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली
 

पदाचे नाव - रिक्त पद संख्या
अपर परिवहन आयुक्त - 1 पद
सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा)- 1 पद
उप परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा)- 1 पद
परिवहन उप आयुक्त (उच्च श्रेणी)- 3 पद
उप परिवहन आयुक्त (निरिक्षण )- 1 पद
उप परिवहन आयुक्त (संगणक)- 1 पद 
प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर - 1
प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण - 1 
प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई मध्य - 1
प्रादेशिक परिवहन अधिकारी औरंगाबाद - 1
प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे - 1
-----

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many posts in state transport department is vacant, many officers have extra charge