गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
Sunday, 11 August 2019

काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर... इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले... टॉयलेटसाठी शिवसेना-भाजपमध्ये राडा... व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर... इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले... टॉयलेटसाठी शिवसेना-भाजपमध्ये राडा... व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...
 

- काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर

जम्मू आणि काश्‍मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकणारे कलम 370 रद्द करण्यास राज्यातील जनेतेने मोठ्या प्रमाणात विरोध सुरू केला आहे. संचारबंदी असतानाही हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत.

(सविस्तर बातमी)

- कोयनेतून 53,882 तर राधानगरीतून 4256 क्युसेक विसर्ग​

राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 2856 क्युसेकने विसर्ग व विद्युत विमोचकामधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी चार वाजता सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणामधून 53,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

(सविस्तर बातमी)

- ...म्हणून लोकसभेऐवजी राज्यसभेत मांडले कलम 370

जम्मू-काश्मीरातील स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत न मांडता पहिल्यांदा राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) स्पष्टीकरण दिले.

(सविस्तर बातमी)

- इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले

जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

(सविस्तर बातमी)

- कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी : जिल्हाधिकारी

जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणारे तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.

(सविस्तर बातमी)

- टॉयलेटसाठी शिवसेना-भाजपमध्ये राडा

एकीकडे केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असतानाच आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील दहिसर पूर्व येथील केतकी पाड्यात शौचालयाच्या उद्घाटनावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले.

(सविस्तर बातमी)

- व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले

भारताने 23 वर्षांखालील गटाच्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत पाकिस्तानला हरविले.

(सविस्तर बातमी)

- प्रेग्नंसीच्या 8व्या महिन्यात एमीनं केलं टॉपलेस फोटोशूट; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. सध्या एमी तिचा प्रेग्नंसी पिरियड एंजॉय करत असून अनेकदा ती सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचे आपले फोटो शेअर करताना दिसते.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 11th August 2019