गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
Tuesday, 20 August 2019

खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या... बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या... बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी

राज्यात पंतप्रधान आवास योजनेत आतापर्यंत 11.5 लाख घर निर्मितीला मिळाली आहे. आतापर्यंत 3.84 लाख घरांचे काम वेगाने सुरू आहे. जुलै महिन्यात 20 राज्यातील विभागातील शहरात मंजुरी मिळाली आहे.

(सविस्तर बातमी)

- ... अखेर झाकिर नाईकने मागितली माफी

मलेशियातील हिंदूंना भारतातील मुस्लिमांपेक्षा शंभरपटीने अधिक अधिकार आहेत, असे विधान नाईक याने केले होते. 

(सविस्तर बातमी)

- राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी' कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीच्या नोटिसीला उत्तर देताना मी एकटाच ईडी कार्यालयात जाणार असून कुठल्याही पद्धतीचे शक्तिप्रदर्शन मनसे कार्यकर्त्यांनी करू नये असे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.

(सविस्तर बातमी)

- ईडीच्या चौकशीवर राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

(सविस्तर बातमी)

- पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या

महापुरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 12 शाखा आणि एक एटीएम केंद्र पाण्यात बुडाले होते. यात सुमारे बँकेचे सुमारे 35 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

(सविस्तर बातमी)

- Ashes 2019 : स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन नाहीच; तिसऱ्या कसोटीस मुकणार

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी हे जाहीर केले.

(सविस्तर बातमी)

- भारताच्या नव्या पाकिस्तानी जावयाचे दुबईत फोटोशूट

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि हरियाणातील शामिया खान हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी दुबईमध्ये खास फोटोशूट केले आहे.

(सविस्तर बातमी)

- बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.

(सविस्तर बातमी)

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 20th August