भाजपचा मनी आणि मुनींच्या जीवावर विजय: संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

भाजपने मिळविलेला हा विजय मनी आणि मुनींच्या जीवावरचा आहे. जैन मुनींनी भाजपचा प्रचार केला. जैन मुनींनी जातीच्या आधारावर मते मागितली. त्यांच्या जोरावर भाजपने निवडणूक जिंकली. जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसविले जात आहे. त्या जैन मुनीची वागणूक ही झाकीर नाईकसारखी आहे. त्या जैन मुनीविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.

मुंबई: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जीवावर विजय मिळविल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने 95 पैकी 60 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली होती. मीरा-भाईंदरमध्ये जैन धर्मीयांची संख्या अधिक आहे. जैन मुनी भाजपचा प्रचार करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे भाजपच्या विजयाबद्दल विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत होती.

संजय राऊत म्हणाले, की भाजपने मिळविलेला हा विजय मनी आणि मुनींच्या जीवावरचा आहे. जैन मुनींनी भाजपचा प्रचार केला. जैन मुनींनी जातीच्या आधारावर मते मागितली. त्यांच्या जोरावर भाजपने निवडणूक जिंकली. जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसविले जात आहे. त्या जैन मुनीची वागणूक ही झाकीर नाईकसारखी आहे. त्या जैन मुनीविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. जैन, गुजराथी समाज शिवसेनेला मतदान करत होता. पण, भाजपने जैन मुनींचा वापर प्रचारासाठी केला. या समाजांना आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला गेला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Mumbai news Sanjau Raut criticize BJP on mira bhayander