तो पराभव जिव्हारी लागला अन् शिवसेना-राणा वादाची ठिणगी पडली

नवनीत राणा यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत कायम खटके उडत आहेत.
navneet rana and ravi rana
navneet rana and ravi ranasakal

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची राज्यभर सध्या चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाबाबतच्या भूमिकेनंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या विरोधात रणशिंग फुकलेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडल्याने आता राणा विरुद्ध शिवसेना असा आक्रमक पवित्रा दिसतोय.पण तुम्हाला माहितेय का राणा विरुद्ध शिवसेना हा वाद आताचा नाही. पाहूया सविस्तर तपशील. (the longstanding feud between rana and shivsena)

navneet rana and ravi rana
कुठं उष्णतेची लाट, कुठं गारपीट; हवामान विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन

नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2019 ला लोकसभेत निवडून आल्या आहेत. या अनुषंगाने त्यांनी नैसर्गिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूला उभे राहायला हवे होते. पण, तसे दिसले नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असूनही नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेत असल्याने सर्व अचंबित आहे. विशेषत: नवनीत राणा यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत कायम खटके उडत आहेत.

navneet rana and ravi rana
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले म्हणून...- नवनीत राणा

२०१९ ची निवडणूक

2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. तेव्हापासून शिवसेना विरुद्ध राणा असा राजकीय वाद सुरु झाला. 2014 मध्ये पराभव झाल्यानंतर नवनीत राणा यांनी मतदारसंघ पिंजून काढला. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आनंदराव आडसुळांविरोधात उभ्या राहिल्या. लोकसभेत शिवसेना-भाजपा युती होती. यावेळी अपक्ष म्हणून उभा राहिलेल्या राणा यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला. यावेळी मात्र, राणा यांनी मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली आणि गेल्या 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला हरवलं. या पराभवानंतर राणा विरुद्ध शिनसेना असं चित्र पुन्हा दिसलं

navneet rana and ravi rana
'नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा…'; केंद्राची TV चॅनल्सना ॲडव्हायझरी

२०१४ च्या निवडणूकीनंतर आधी अडसूळ त्यांचे टार्गेट होते, आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चालवला आहे. शिवसेनेनेदेखील राणा यांना अनेकदा अडचणीत आणल्याचे पाहायला मिळाले आहे. यात अॅट्रोसिटीचा गुन्हा, जात प्रमाणपत्र आणि जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र चांगलेच गाजले होते. शिवसेनेच्या प्रत्येक हल्ल्याला राणा यांनी मात्र जोरदार प्रत्युत्तरही दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com