स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार? तंत्र शिक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार 'ही' मागणी

MPSC
MPSC

पुणे : 'कोरोना'मुळे यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा न झाल्यास ज्यांची वयोमर्यादा यंदा संपणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी एक वर्षाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

'कोरोना'मुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. लाॅकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना पुणे सोडून गावाकडे जावे लागले आहे, त्यांचे क्लास देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अनेक वेळा विद्यार्थ्यांना अपयश येते. त्यामुळे परीक्षेसाठी जेवढी वय मर्यादा असते तो पर्यंत ते प्रयत्न करतात. शेवटच्या संधीत अनेकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होते. कोरोनामुळे 26 एप्रिलला होणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 आणि 10 मे रोजी होणारी महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट ब संयुक्त परीक्षा 2020 रद्द केली आहे.

त्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे अनेकांची ही संधी जाणार आहे. याचा विचार करून उदय सामंत यांनी ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वय यंदा संपणार आहे, त्यांना एक वर्षाची मुदत वाढवून द्यावी, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com