महाराष्ट्रातून सहकार्य देऊ; एलॉन मस्क यांच्या ट्विटला जयंत पाटलांचे उत्तर

उत्‍पादन कारखाना स्थापित करण्‍यासाठी महाराष्ट्रातून एलॉन मस्कला आमंत्रण
Elon Musk
Elon Muskटीम ईसकाळ

अमेरिकेची इलेक्ट्रीक कार निर्माता कंपनी टेस्लाला भारतीय बाजारपेठेत समावेश करण्याची इच्छा आहे मात्र अलीकडेच भारतात टेस्ला कंपनी लाँच करताना भारत सरकारच्या आव्हानाचा सामना करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया एलॉन मस्कनी ट्वीटच्या माध्यमातून दिली होती. अशा परिस्थितीत उत्पादनाच्या लाँन्चिगची वेळ सांगू शकत नाही. टेस्लाचे उत्पादन भारतात आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले होते. यावर भारतातील उत्पादनास वचनबध्द केल्याशिवाय टेस्ला शुल्क कपातीची मागणी करू शकत नाही. अशी खोचक प्रतिक्रीया भारत सरकारच्या अधिकाऱ्याने दिली होती. यानंतर देशातील विविध राज्यांनीही एलॉन मस्क त्यांच्या राज्यात प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

Elon Musk
...तर भाजपला ५० पेक्षा कमी जागा मिळतील - जयंत पाटील

एलॉन मस्क यांच्या ट्वीटला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे प्रतिउत्तर दिले. जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात तुमची कंपनी स्थापन करण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ती मदत पुरवू. आम्‍ही तुम्‍हाला महाराष्ट्रात तुमचा उत्‍पादन कारखाना स्थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो."

Elon Musk
राहुल गांधींकडून विराटच्या राजीनाम्याची दखल, 'अशा परिस्थितीत...'

एलॉन मस्क भारतात २०१९ पासून कार लाँच करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र टेस्ला भारतात येण्याआधी आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करीत आहे. यावर भारत सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र इतर राज्यांनी उत्‍पादन कारखाना स्थापित करण्‍याकरीता आमंत्रित केल्याने एलॉन मस्क आता काय पाऊले उचलतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com