Bawaal Movie: कानपूरच्या गल्ल्यांमध्ये वरुणचा बवाल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Varun Dhavan"s Bawal
Film Shooting Starts In Kanpur

Bawal Movie :कानपूरच्या गल्ल्यांमध्ये वरुणचा बवाल..

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनचे लाखो फॅन्स त्याची सोशल मीडियावर अपडेट घेतच असतात.आणि त्याच्या पोस्ट्स आणि व्हिडिओला सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत असतात.मात्र तो प्रत्यक्षात असा गल्ल्यांतून बुलेट सवारी करताना दिसावा असा विचार कानपूरवासीयांनी कधी केला नसावा.त्यामुळे त्याला असं बुलेटवर जाताना पाहून खरं तर सुरुवातीला लोकांना विश्वासच बसला नाही.नंतर मात्र शूटिंग चे सामान आणि सेट बघून लोकांना वरूण धवनची शूटिंग कानपूरमधे असल्याचे कळले.

प्रसिद्ध अभिनेता वरुण धवणच्या येणाऱ्या 'बवाल' या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.ज्यामधे लखनऊच्या आनंदबागमधील गल्ली बोळ्यांचे दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळणार होते.परंतु लखनऊ प्रशासनाकडून अनुमती न मिळाल्याने लखनऊच्या आनंदबाग गल्ली शूटिंगसाठी कानपूरची निवड करण्यात आली.परवाना मिळताच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

शूटिंग जवळपास सात दिवसांचे असणार

'बवाल' या चित्रपटात लखनऊमधील आनंदबागच्या गल्ल्यांचे दृश्य दाखवण्यात येणार आहे.त्याची सुरुवात कानपूरमध्ये झाली असून पुढील शूट 'मेथाडिस्ट स्कूलमधे' होण्याची शक्यता आहे.या चित्रपटात संपूर्ण लखनऊला दाखवण्याचा प्रयत्न आहे.गुरुवारी झालेल्या शूटिंगमधे लखनऊच्या आनंदबागसारखे दृश्य दाखवण्यात आले होते.तसा सेटही त्यासाठी लावण्यात आला होता.

ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी

वरूण धवनच्या ऑटोग्राफसाठी चाहत्यांनी सेटजवळ प्रचंड गर्दी केली होती.मुली ऑटोग्राफसाठी चक्क रांगेत लागल्या होत्या.वरुणने देखील फॅन्सला निराश न करता ऑटोग्राफ देत चाहत्यांची मनं जिंकून घेतली.त्याने त्याच्या चाळीसपेक्षा जास्त चाहत्यांना ऑटोग्राफ दिल्याचे कळते आहे.

हेही वाचा: Film: मराठी, हिंदी चित्रपटांना पुन्हा सुगीचे दिवस!

कानपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील ५५० कलाकारांना मिळणार संधी

लाइन प्रोड्यूसर रिजवान अख्तर म्हणाला कि,'बवाल' हा चित्रपट साजिद नाडियाडवाला प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत बनवण्यात येत आहे.तसेच चित्रपटात कानपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील ५५० कलाकारांना चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.चित्रपटात 'ज्वाला देवी विद्या मंदिर इंटर कॉलेज' चे भवन आणि लखनऊच्या आनंदबागचे दृश्य प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे.या चित्रपटात वरुण धवन एक शिक्षकाची भूमिका साकारतोय.कानपूरच्या मेथाडिस्ट स्कूलमधे १५ ते १९ एप्रिलपर्यंत चित्रपटाची शूटिंग चालणार असल्याचे कळते आहे.

Web Title: Actor Varun Dhawans Next Film Bawal Shooting In Lakhnau Kanpoor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..