एकाचवेळी दोनशे देशांत आणि 15 भाषांमध्ये प्रदर्शित झाला 'गुलाबो सिताबो'....

gulabo sitabo
gulabo sitabo

मुंबई ः सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा गुलाबो सिताबो हा चित्रपट आज अॅमझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सुजित सरकार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.  या दोन महत्त्वपू्र्ण कलाकारांबोबरच फारूख जफर यांनीही या चित्रपटात काम केले आहे. मिर्झा यांच्या पत्नीच्या भूमिकेत त्या आहेत. यापूर्वी त्यांनी उमराव जान, पिपली लाईव्ह, स्वदेस अशा चित्रपटात काम केले आहे. यामध्ये मिर्झाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे, तर बाके रस्तोगीच्या  भूमिकेत आयुषमान खुराना आहे. 

तब्बल दोनशे देशांमध्ये एकूण पंधरा भाषांमध्ये हा चित्रपट  सब-टायटल्सने प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतातील हा पहिलाच असा चित्रपट आहे आणि तो हिंदीबरोबरच अरबी, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंडोनेशियन, हिब्रू, जर्मन, फ्रेंच, कोरियन, ग्रीक, तुर्की आदी पंधरा भाषेत सब-टायटल्सने प्रदर्शित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची अशी ही मोठी झेप आहे.  

वाचा ः वाफेघर ग्रामस्थांच्या एकीमुळे गाव उजळले; जनसहभागातून महावितरणच्या कामाला वेग...

मालक आणि भाडेकरू यांच्यातील तू तू मै मै या चित्रपटात गमतीशीररीत्या दर्शविण्यात आली आहे. लखनौमधील एका हवेलीचे मालक मिर्झा असतात. ती हवेली अत्यंत जीर्ण झालेली असते आणि तेथे काही कुटुंबे ३० ते ७० रुपये देऊन भाड्याने राहात असतात. परंतु एक भाडोत्री असा असतो की तो भाडे देत नाही. आज किंवा उद्या देऊ असा बहाणा करून वेळ मारून नेतो. तो भाडेकरू असतो बांके. त्याला मिर्झा कंटाळलेले आणि वैतागलेले असतात. 

त्याने येथून निघून जावे याकरिता वेगवेगळ्या क्लृप्त्या ते आखतात. परंतु त्याचा काही एक परिणाम होत नाही. त्या दोघांमधील धुसफूस आणि रुसवा कायम असतो. त्यानंतर मिर्झा पोलिस ठाण्यात जातात व काय होते याचे गमतीदार चित्रण या चित्रपटात आहे. जुही चतुर्वेदीने पटकथा व संवाद लिहिले आहेत.. हा चित्रपट म्हणजे फॅमिली ड्रामा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com