देसी गर्ल प्रियंकानं केलं आर माधवनच्या वेदांतचं कौतुक, तू तर...|Bollywood Actor R Madhavan Desi Girl Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhvan News

देसी गर्ल प्रियंकानं केलं आर माधवनच्या वेदांतचं कौतुक, तू तर...

Bollywood News: टॉलीवूडचा सुपरस्टार आर माधवन (R Madhvan) अशीच त्याची ओळख नाही तर तो बॉलीवूडमध्ये देखील तितकाच फेमस आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते बॉलीवूडमध्ये आहे. आता आर माधवनच्या मुलाचे कौतुक (Entertainment News) करणारी बातमी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे. कोपेनहेगनमध्ये डेनिश ओपन येथे झालेल्या पुरुषांच्या 800 मीटरच्या फ्री स्टाईल (Bollywood Actress) जलतरण स्पर्धेत आर माधवनच्या मुलानं नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यानं त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं आहे. आता बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्री प्रियंका चोप्रानं देखील त्यावर कमेंट केली आहे.

प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिनं आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचं कौतुक केलं आहे. यापूर्वी प्रियंका नाही तर बॉलीवूडची क्वीन कंगनानं देखील वेदांतवर कौतुकाचा वर्षाव केला होता. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यासगळ्याचे आर माधवननं आभार मानले आहेत. वेदांतच्या विजयावर प्रियंकानं आनंद व्यक्त केला आहे. तिनं आपल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की, वेदांत तू गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद आणि तुझं मनपूर्वक अभिनंदन. देशाचे नाव तू मोठं केलं आहे. माधवन आणि सरिता तुम्हा दोघांचेही अभिनंदन. मला आता यावेळी काय बोलावे हे कळत नाही. तुमच्यावर देवाची कृपा आहे. ती अशीच राहो ही त्याच्याकडे प्रार्थना. या शब्दांत प्रियंकानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video: एवढं महत्वाचं आहे का फोनवर बोलणं? पाहा काय घडलंय

सुरुवातीला आर माधवननं वेदांतच्या विजयी कामगिरीवर आनंद व्यक्त केला होता. त्याबद्दल त्यानं सोशल मीडियावर खास पोस्टही शेयर केली होती. त्यामध्ये त्यानं वेदांतचा एक फोटोही शेयर केला होता. त्यानं लिहिलं होतं की, खूप साऱ्या शुभेच्छा. देशाला एक सुवर्णपदक मिळवून दिल्याबददल मनपूर्वक शुभेच्छा. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणाऱ्या शिल्पानं देखील वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. माधवन तुला वेदांतचा अभिमान हवा. अशा शब्दांत तिनं वेदांतचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा: Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

Web Title: Bollywood Actor R Madhavan Desi Girl Priyanka Chopra Praised Vednat Congraulation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top